महाराष्ट्रराजकारण

मौलाना नोमानी यांच्या व्होट जिहादवरून वातावरण तापले, भाजपची निवडणुक आयुक्तांना पत्र

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे चार दिवस उरले असताना मराठा + मुस्लिम कॉम्बिनेशन करून व्होट जिहाद करायचा मामला संपूर्ण देशात तापला असून मौलाना सज्जाद नोमानी यांनी एक व्हिडिओ जारी करून मुसलमानांना महाराष्ट्रात उघडपणे व्होट जिहाद करायची चिथावणी दिली आहे.

इतकेच नाही तर शरद पवार हे महाराष्ट्रातल्या व्होट जिहादचे “सिपेसालार” म्हणजे सरदार असून उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि नाना पटोले हे त्या व्होट जिहादचे “शिपाई” आहेत, अशी मुक्ताफळं देखील मौलाना सज्जाद नोमानी यांनी उधळली आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप महायुतीला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीला व्होट जिहाद करून सर्व मुसलमानांनी मतदान करायचे, असे आवाहन मौलाना सज्जाद नोमानी यांनी केले आहे. केवळ महाराष्ट्रात भाजपला पराभूत करायचा आपला उद्देश नसून केंद्रातले मोदी सरकार देखील जास्त काळ टिकता कामा नये, हा आपला मुख्य उद्देश असल्याचे सज्जाद नोमानी यांनी त्या व्हिडिओमध्ये नमूद केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मौलाना सज्जाद नोमानींचा संबंधित व्हिडिओ जाहीर सभेत ऐकवल्यानंतर शरद पवार संतापले. त्यांनी देखील दुसऱ्या जाहीर सभेत देवेंद्र फडणवीसांना झापले. तशा बातम्या मराठी माध्यमांनी चालविल्या व्होट जिहाद हा शब्द मुसलमानांनी काढला नसून स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच पहिल्यांदा काढला असल्याचा आरोप शरद पवारांनी केला. मात्र सज्जाद नोमानींनी थेट शरद पवारांना व्होट जिहादचे सिपेसालार म्हटले, त्याबद्दल त्यांनी मौन बाळगणे पसंत केले.

किरीट सोमय्या यांचे मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र
किरीट सोमय्या यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना पत्र लिहून मौलाना खलीलुर रहमान सज्जाद नोमानी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. नोमानी द्वेषपूर्ण भाषणे देत असून मुस्लिमांना भाजप समर्थकांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचे आवाहन करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी ‘व्होट जिहाद’चे आवाहनही ते करत आहेत. यावर नोमानी यांनीही स्पष्टीकरण दिले आहे.

किरीट सोमय्या यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, “मौलाना यांनी आपल्या भाषणात भाजपला मतदान करणाऱ्या मुस्लिमांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. हे भाषण सोशल मीडियावर फिरत आहे. मी तुम्हाला योग्य ती कारवाई करण्याचे आवाहन करतो.” किरीट सोमय्या यांनी व्हिडिओची लिंकही निवडणूक आयोगाला शेअर केली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button