
नवी दिल्ली : २.७७ लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या मालकीन असलेल्या जिंदाल ग्रुपच्या अध्यक्षा आणि स्टील किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवंगत ओपी जिंदाल यांच्या पत्नी सावित्री जिंदाल यांना कोणत्याच राजकीय पक्षाने तिकीट दिले नाही, त्यामुळे त्यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून उभ्या राहत आहेत.
सावित्री जिंदाल यांचा मुलगा नवीन जिंदाल हा भाजप खासदार आहे. दरम्यान, नवीन जिंदाल हे सावित्री जिंदाल यांच्या प्रचारापासून दूर आहेत. मात्र, त्यांची पत्नी शालू जिंदाल या सावित्री जिंदाल यांच्या प्रचारासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. शालू जिंदाल या आपल्या सासूसाठी मतं मागत आहेत. तसेच, नवीन जिंदाल यांची मुलेही प्रचारात उतरली आहेत.
हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी सावित्री जिंदाल या हिसारमधून मैदानात उतरल्या आहेत. या निवडणुकीत त्यांना भाजपकडून तिकीट मिळाले नाही. नुकतेच त्यांनी सांगितले होते की, अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी मान्य करणार नाही. तसेच, कोणत्याही पक्षाने निवडणुकीसाठी तिकीट दिले नाही, त्यामुळे आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे, सावित्री जिंदाल यांनी सांगितले होते. त्यामुळे अशा परिस्थितीत भाजप खासदार नवीन जिंदाल यांना आपल्या आईच्या प्रचारापासून लांब राहावे लागले आहे.