तरुणीने आधी मुलासोबत ठेवले शारीरिक संबंध, नंतर केला खून, हत्येचे कारण जाणून पोलीसही झाले थक्क
जयपूर/बिकानेर : राजस्थानमधील बिकानेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका 20 वर्षीय तरुणीचे एका तरुणासोबत संबंध होते. मुलीच्या आईने तिला तिच्या प्रियकरासोबत संशयास्पद स्थितीत पाहिल्यावर तरुणीने प्रियकराच्या हत्येचा कट रचला. मुलीने तिची आई आणि भावासोबत त्या मुलाची विष देऊन हत्या केली. 5 महिने जुन्या या प्रकरणात पोलीस या घटनेस आत्महत्या मानत होते, मात्र त्यांनी या प्रकरणाची कसून चौकशी केली असता ही हत्या असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा करताना मृत मुलाची मैत्रीण, त्याची आई आणि भावाला अटक केली आहे.
हे धक्कादायक प्रकरण बीकानेर जिल्ह्यातील पुगल पोलीस ठाणे हद्दीतील रामसर या छोट्या गावामधील आहे, जिथे 5 महिन्यांपूर्वी 16 फेब्रुवारी रोजी लियाकतचा मृतदेह एका शेतात संशयास्पद अवस्थेत आढळला होता. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपीची मैत्रीण सरोज, तिचा भाऊ भंवरराम मेघवाल आणि त्याची आई माघी यांना अटक केली आहे. याप्रकरणी मृताचे वडील काजू खान यांनी फिर्याद दिली होती. यावेळी शवविच्छेदन अहवालात विष प्राशन केल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली, मात्र या प्रकरणात मृताच्या वडिलांनी आपल्या मुलाचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा तपास करून तिघा आरोपींना अटक करून चौकशी केली असता त्यांनी संपूर्ण रहस्य उघड केले.
मयत लियाकतच्या मृत्यूवरून त्याचे वडील काजू खान यांनी हत्येचा संशय व्यक्त केला. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर मृताच्या वडिलांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सरोज, भंवर आणि माघी यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्या संपूर्ण कटाचे रहस्य उघड झाले. पोलिसांनी सांगितले की, तिन्ही आरोपींनी लियाकतला जबरदस्तीने पकडून त्याच्या पाण्यात विषारी कीटकनाशक मिसळले आणि त्याला ते प्यायला लावले. यानंतर तो बेशुद्ध पडल्यावर त्यांनी त्याला शेतात नेऊन लटकवण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणी आल्याने तिघेही लियाकतचा मृतदेह सोडून पळून गेले.
पोलिसांनी सांगितले की, चौकशीदरम्यान आरोपींनी सांगितले की, 15 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा लियाकत आणि त्याचा मित्र बिलाल खान आरोपी भंवर रामच्या शेतात पोहोचले, तिथे रात्री उशीर झाल्यामुळे ते तिथेच थांबले. दरम्यान, भंवरची आई माघी देवी झोपेतून उठली असता त्यांना त्यांची मुलगी सरोज आणि लियाकत संशयास्पद अवस्थेत दिसली. यावर माघी देवीने आपला मुलगा भंवर राम याला हा प्रकार सांगितला. यानंतर तिघांनी लियाकतला मारण्याचा निर्णय घेतला. पोलिस या प्रकरणात बिलालच्या संशयास्पद भूमिकेचाही विचार करत आहेत. याबाबत त्याची चौकशी सुरू आहे.