क्राइमदेश-विदेश

पत्नीच्या डॉक्टर प्रियकराची सुपारी दिली मुलीच्या बॉयफ्रेण्ड, हत्या करून पोस्ट केली रिल

नवी दिल्ली: पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणाने दक्षिण दिल्लीतील जैतपूर एक्स्टेंशनच्या खड्डा कॉलनीतील एका डॉक्टरांची सुपारी देवून हत्या करण्यात आली. या हत्याची सुपारी आपल्याच मुलीच्या अल्पवयीन बॉयफ्रेण्डला त्याने दिली.

पोलिसांनी गोळ्या झाडणाऱ्या अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. घटनेनंतर आरोपीने त्याच्या इंस्टाग्रामवर हत्या केल्याची पोस्ट टाकली होती. जेव्हा पोलिसांनी या अल्पवयीन आरोपीकडे चौकशी केली तेव्हा त्याने याप्रकरणात अत्यंत धक्कादायक माहिती दिली. अनैतिक संबंधातून या डॉक्टरची हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. रुग्णालयातील एका नर्ससोबत या डॉक्टरचे प्रेमसंबंध होते. तर ज्या अल्पवयीन मुलाने या डॉक्टरची हत्या केली, त्याचे नर्सच्या मुलीशी प्रेमसंबंध होते.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा नर्सचा नवरा आहे. ही नर्स आणि डॉक्टर यांच्यातील संबंधांबाबत त्याला माहित झाले आणि त्याने आपल्या मुलीच्या बॉयफ्रेण्डचा वापर करून डॉक्टरला संपवलं. नर्सचा नवरा सध्या फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर हे खासगी रुग्णालय बंद करण्यात आले आहे. घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे. मृत डॉक्टर हा जुन्या दिल्लीतील जामा मशीद भागातील रहिवासी होता. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.
युनानी डॉक्टर जावेद अख्तर यांची बुधवारी (२ ऑक्टोबर) रात्री १.१५ च्या सुमारास खड्डा कॉलनी येथील नीमा रुग्णालयात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन आरोपी रुग्ण म्हणून रुग्णालयात आले होते. त्यापैकी एकाच्या पायाला दुखापत झाली होती. त्याने पायाची ड्रेसिंग करुन घेतली आणि मग औषध घेण्याच्या बहाण्याने दोघेही डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेले. यापैकी एकाने डॉक्टरच्या डोक्यात गोळी झाडली, त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडली तेव्हा रुग्णालयात एक नर्स आणि एमडी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button