मद्यधुंद अवस्थेत समाजकल्याण विभागाच्या अधीक्षकाने केले हिट ॲण्ड रन
दाेन चारचाकीसह दुचाकीला दिली धडक
नाशिक : मद्यधुंद अवस्थेत समाजकल्याण विभागाच्या अधीक्षकाने भरधाव गाडी चालवत दोन चारचाकींसह दुचाकीला धडक दिली. त्यानंतर अधीक्षकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली. समाजकल्याण विभागाचा अधीक्षक विजय चव्हाण यांने मद्य प्राशन करून गाडी चालवत होता. यात त्याला गाडी चालवणे अवघड झाले होते. आणि जो समोर येईल त्याला त्याने धडक दिली. यात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी संतप्त लोकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.
शुक्रवारी (दि. २३) रात्री साडेदहाच्या सुमारास विजय चव्हाण (५६) मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता. काठे गल्ली सिग्नलसमोरील पौर्णिमा बसस्टॉप परिसरातील गणपती स्टॉलजवळ येताच त्याचा गाडीवरील ताबा सुटला. या ठिकाणी उभ्या असलेल्या गाड्यांना त्याने जोरदार धडक दिली. तसेच दुचाकीलाही धडक दिली. यात सर्व गाड्यांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, विजय चव्हाणला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.