म्हणून अक्षय शिंदेचा मृतदेह पुरण्याची कुटूंबियांची इच्छा

मुंबई : बदलापूर प्रकरणाचा आरोपी अक्षय शिंदेचा पोलिस एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. हिंदू पध्दतीनुसार त्याच्या मृतदेह जाळण्यात येतो. मात्र आता त्याच्या पर्थिवाचे दहन करण्यात येणार नसून तो मृतदेह पुरणार आहे, अशी माहिती अक्षय शिंदेच्या वकिलांनी दिली आहे.
अक्षय शिंदेचे वकिल अॅड. अमित कटारनवरे म्हणाले, ‘पुरावे नष्ट होऊ नये म्हणून मृतदेह पुरणार आहे. अक्षयच्या मृतदेहाचं दहन नाही तर पुरणार आहे. ज्यामुळे भविष्यात भविष्यात काही पुरावे लागले तर मृतदेह पुन्हा बाहेर काढता येईल. परंतु मृतदेह पुरण्यासाठी देखील जागा मिळत नाही. आम्हाला आमच्या मुलाला न्याय मिळवून द्यायचा आहे, अशी कुटुंबाची भावना आहे. त्यासाठी कुटुंबाचा हा प्रयत्न आहे की, अक्षयचा मृतदेह शक्य तितका जतन करुन ठेवू म्हणून आम्ही दहन करणार नाही तर पुरणार आहे.
मात्र, अक्षयचा मृतदेह पुरण्यासाठी जागा मिळत नसल्याची तक्रार कुटुंबीयांनी कोर्टात केल्यानंतर जागा उपलब्ध करून देणार असल्याचे सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितले आहे. राज्य सरकार आणि सरकारी वकीलांतर्फे कोर्टाला आश्वासन देण्यात आले की, आम्ही स्थानिक प्रशासन म्हणजे पालिका प्रशासनाशी बोलून अक्षय शिंदेंच्या अंत्यविधीसाठी आम्ही त्याच्या पालकाच्या इच्छेप्रमाणे जागा उपलब्ध करून देऊ.
बदलापुरात अंत्यसंस्कार करण्यास स्थानिकांचा विरोध आहे. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर वेगवेगळे पडसाद उमटत आहे. या प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी अक्षयच्या वडिलांनी केली आहे. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचे काहींनी समर्थन केले तर काहींनी एन्काऊंटरवर सवाल देखील उपस्थित केले आहे. मात्र बदलापुरातील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करायला स्थानिकांनी विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थितीत अक्षय शिंदे याचे अंत्यसंस्कार मांजर्ली स्मशानभुमीत होऊ देणार नाही, असा पवित्रा स्थानिकांनी घेतला आहे, तर पोलिसांनी मात्र अंत्यसंस्काराला कोणीही विरोध करू शकत नाही असं म्हटलं आहे. त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस विशेष खबरदारी घेत आहेत.