भाजपकडून शिंदे गटाला गृहखात्याऐवजी हे तीन पर्याय
मुंबई : गृहखात्यासाठी आग्रही असणारे आिण त्यासाठी नाराज असलेले एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जरी शपथ घेतली असली तरी ते गृह खात्याच्या तोडीस तोड असलेल्या खात्यासाठी आग्रही आहे. अशातच भाजपकडून एकनाथ शिंदेंना गृह खात्याऐवजी 3 खात्यांचा पर्याय देण्यात आल्याची माहिती आहे. त्यापैकी एकाची निवड शिवसेना शिंदे गटाला करायची आहे. त्यामुळे, शिवसेनेपुढे मोठा पेच निर्माण झाल्याचे दिसून येते.
गृहमंत्रालयाच्या बदल्यात एकनाथ शिंदे यांच्यापुढे महसूल, जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या तीन खात्यांचा पर्याय देण्यात आला आहे. यापैकी शिवसेनेला 1 पर्याय निवडावा लागणार आहे. मात्र, गृहखात्याइतकेच महत्वाचे, तोडीस तोड खाते मिळवण्याकरता शिवसेना आग्रही आहे. मात्र, ऊर्जा आणि गृहनिर्माण खाते शिवसेनेला मिळण्याची शक्यता कमी असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे, वरील 3 पर्यायांपैकी एक खाते शिंदे गटाच्या वाट्याला येऊ शकते, त्यामध्ये महसूल हे वजनदार खातं आहे. गत महायुती सरकारमध्ये महसूल खाते भाजपकडे होते, राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे या खात्याची धुरा होती. तर, सार्वजनिक बांधकाम हेही खाते भाजपकडेच होते. मात्र, मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याने एकनाथ शिंदे गृहखात्यासाठी आग्रही आहेत. मात्र, भाजप देखील गृह खातं सोडायला तयार नाही.
दरम्यान, शिवसेनेच्या 13 नेत्यांना मंत्रिपदं मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे. शिवसेनेकडून 6 नवे चेहरे दिले जाण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. शिवसेनेचे 13 जण मंत्रिपदाच्या शर्यतीत असून अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
‘हे’ आहेत शिवसेनेचे संभाव्य मंत्री
एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री)
गुलाबराव पाटील
दादा भुसे
उदय सामंत
तानाजी सामंत
दीपक केसरकर
शंभुराज देसाई
भरत गोगावले
अर्जुन खोतकर
संजय शिरसाट
योगेश कदम
बालाजी किणीकर
प्रकाश सुर्वे
मंगेश कुडाळकर