देश-विदेशराजकारण

देशात पहिलेच ठरले हे विरोधी पक्षच नसणारे राज्य, सर्वच आमदार सत्ताधारी

सिक्कीम : सध्या देशात दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि १३ राज्यांच्या पोटनिवडणुकांचा काळ सुरु आहे. यापैकी महाराष्ट्र विधानसभा आणि उत्तर प्रदेश पोटनिवडणुकीवर सगळ्यांचे लक्ष आहे. अशातच पूर्वेकडील राज्यात मोठी घडामोड घडली आहे. हे राज्य विधानसभेत विरोधकच नसलेले एकमेव राज्य ठरले आहे.

निकोप आिण निरोगी लोकशाहीसाठी विरोधी पक्ष असणे महत्वाचे आहे. विरोधी पक्षाकडून सत्ताधाऱ्यावर अंकुश ठेवण्याचे काम केले जाते. मात्र देशात एक राज्य असे आहे की, जिथे विरोधी पक्ष उरलाच नाही.

देशात पहिल्यांदाच विधानसभेत विरोधी पक्ष नाही, असे घडले आहे. सिक्कीममध्ये पोटनिवडणुकीत प्रेम बहादुर भंडारी आणि डेनियल राय यांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. यामुळे सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाचे उमेदवार आदित्य गोळे आणि सतीश चंद्र राय हे बिनविरोध निवडले गेले आहेत. मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांच्या नेतृत्वात एसकेएमकडे आता विधानसभेचे सर्वच्या सर्व ३२ आमदार असणार आहेत.

दोन्ही उमेदवारांकडे प्रस्तावकांची अपेक्षित संख्या नव्हती असे अर्ज पडताळणीत समोर आले आहे. यामुळे त्यांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. तर पोबिन हंग सुब्बा यांचाही अर्ज अपूर्ण अॅफिडेविट दिल्याने फेटाळण्यात आल्याचे निवडणूक विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान विरोधी पक्षांनी यावर टीका केली आहे. विरोधी पक्षांनी यावर टीका करताना लोकशाहीवर हल्ला असल्याचे म्हटले आहे. तसेच याविरोधात हायकोर्ट, सुप्रिम कोर्टात जाणार असल्याचेही म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button