पाटणा : राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत आहे. यातच बिश्नोई गँगनेच बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे. या हत्याप्रकरणातील तीन आरोपींपैकी एकाला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. इतर दोघांची चौकशी सुरु आहे. दरम्यान बिहारमधील अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी थेट लॉरेन्स बिश्नोईलाच ओपन चॅलेंज दिले आहे. लॉरेन्स बिश्नोई सारख्या किंमतशून्य गुंडाच्या पूर्ण नेटवर्कला संपवून टाकेन, असे चॅलेंज त्यांनी केले आहे.
महाराष्ट्र में महाजंगलराज
Y सिक्योरिटी सुरक्षा में सरकार समर्थक
पूर्व मंत्री बाबा सिद्दीकी जी की हत्या इसका
शर्मनाक प्रमाण!बिहार के बेटे बाबा सिद्दीकी की हत्या अत्यंत
दुःखद है,BJP गठबंधन सरकार अपने दल के
इतने रसूख़ वाले नेताओं की रक्षा न कर पा रही है
तो अमलोगों का क्या होगा?— Pappu Yadav (@pappuyadavjapl) October 13, 2024
बिहारमधील पूर्णियाचे खासदार पप्पू यादव ‘एक्स’वरील पोस्टमध्ये लिहितात, ‘ हा देश आहे की &^%#@ची फौज. एक गुन्हेगार तुरुंगात बसून आव्हान देतोय, लोकांना मारतोय, परंतु सर्वजण मौन धरुन पाहतायत.’ असे खडेबोल सुनावत यादव पुढे म्हणतात, ‘लॉरेन्स बिश्नोईनं कधी मूसवालाला मारलं, कधी करणी सेनेच्या प्रमुखाला मारलं आणि आता दिग्गज राजकारण्याला मारलं आहे. जर मला कायदा परवानगी देत असेल तर मी पुढील २४ तासांत लॉरेन्स बिश्नोई सारख्या किंमतशून्य माणसाच्या नेटवर्कला उद्ध्वस्त करुन टाकेन’
यापूर्वीही पप्पू यादव यांनी केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी बाबा सिद्दिकी यांचं वर्णन बिहारचे सुपुत्र असं केलं होतं. दरम्यान, बाबा सिद्दीकी हे मूळचे बिहारचे होते. त्यानंतर मुंबईत येऊन त्यांनी राजकारणात प्रवेश केला. पुढे त्यांनी लिहिलं होतं की, Y श्रेणीची सिक्योरिटीमध्ये माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांची झालेली हत्या म्हणजे, महाराष्ट्रातील महाजंगलराजाचा लाजिरवाणा पुरावा असल्याचं पप्पू यादव यांनी लिहिलं होतं. बिहारचे सुपुत्र बाबा सिद्दीकी यांची हत्या अत्यंत दुःखद आहे. भाजपचे आघाडी सरकार आपल्या पक्षातील अशा प्रभावशाली नेत्यांना संरक्षण देऊ शकत नसेल, तर सर्वसामान्यांचे काय होणार?, असं पप्पू यादव म्हणाले होते.