राज्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक; 59 पोलिसांना पदके जाहीर
मुंबई : महाराष्ट्रातील पोलीस सेवेतील अतुलनीय कार्यासाठी राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला 1,037 पदकांची घोषणा केली आहे. यात पोलीस, अग्निशमन, तुरुंग आणि होमगार्डमध्ये विशेष सेवा बजावणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार दिला जातो. पोलीस सेवेतील अतुलनीय कार्यासाठी अतिरिक्त पोलिस महासंचालक चिरंजीव रामचबिला प्रसाद, संचालक राजेंद्र बालाजीराव दहाळे, सहायक आयुक्त सतीश रघुवीर गोवेकरयांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले.
राज्यातल्या 17 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ प्रदान करण्यात आले. पोलीस शौर्य पदकांमध्ये डॉ. कुणाल शंकर सोनावणे – उप-विभागीय पोलीस अधिकारी, दीपक रंभाजी आवटे – पोलीस उपनिरीक्षक, कै. धनाजी तानाजी होनमाने – पोलीस उपनिरीक्षक (मरणोत्तर), नागेशकुमार बोंड्यालू मदरबोईना – नाईक पोलीस शिपाई, शकील युसुफ शेख – पोलीस शिपाई, विश्वनाथ सामैय्या पेंदाम – पोलीस शिपाई, विवेक मानकू नरोटे – पोलीस शिपाई, मोरेश्वर नामदेव पोटावी – पोलीस शिपाई, कैलाश चुंगा कुलमेथे – पोलीस शिपाई, कोटला बोटू कोरामी – पोलीस शिपाई, कोरके सन्नी वेलादी – पोलीस शिपाई, महादेव विष्णू वानखेडे – पोलीस शिपाई, अनुज मिलिंद तारे (आयपीएस) -अतिरिक्त पोलीस अधीक्षक, राहुल नामदेवराव देव्हाडे – पोलीस उपनिरीक्षक, विजय दादासो सकपाळ – पोलीस उपनिरीक्षक, महेश बोरू मिच्छा – मुख्य शिपाई, समय्या लिंगय्या आसाम – नाईक पोलीस शिपाई यांचा समावेश आहे.
गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ‘पोलीस पदक’ राज्यातल्या 39 पोलिसांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये दत्तात्रय तुळशीदास शिंदे- उपमहानिरीक्षक, संदीप गजानन दिवाण- उपमहानिरीक्षक, शिवाजी ज्ञानदेव फडतरे- उप-अधीक्षक, संजय मारुती खांदे-अधीक्षक, विनीत जयंत चौधरी-उपअधीक्षक, प्रकाश पांडुरंग गायकवाड-उपनिरीक्षक, सदानंद जनाबा राणे- निरीक्षक, विजय मोहन हातिसकर-पोलीस सहआयुक्त, महेश मोहनराव तराडे-उप अधीक्षक, राजेश रमेश भागवत- निरीक्षक, गजानन कृष्णराव तांदूळकर- उपनिरीक्षक, राजेंद्र तुकाराम पाटील- उपनिरीक्षक, संजय साहो राणे-उपनिरीक्षक, गोविंद दादू शेवाळे-उपनिरीक्षक, मधुकर पोछा नैताम- उपनिरीक्षक, अशोक बापू होनमाने- निरीक्षक, शशिकांत शंकर तटकरे- पनिरीक्षक, अक्षयवारनाथ जोखुराम शुक्ला-उपनिरीक्षक,शिवाजी गोविंद जुंदरे- उपनिरीक्षक, सुनील लयाप्पा हांडे- सहाय्यक उपनिरीक्षक, प्रकाश मोतीराम देशमुख-उपनिरीक्षक, दत्तू रामनाथ खुळे- सहाय्यक उपनिरीक्षक, रामदास नागेश पालशेतकर- निरीक्षक (पीए), देविदास श्रावण वाघ-सहाय्यक उपनिरीक्षक, प्रकाश शंकर वाघमारे-सहाय्यक उपनिरीक्षक, संजय दयाराम पाटील- सहाय्यक उपनिरीक्षक, मोनिका सॅम्युअल थॉमस- सहाय्यक उपनिरीक्षक,बंडू बाबुराव ठाकरे- मुख्य शिपाई, गणेश मानाजी भामरे- मुख्य शिपाई,अरुण निवृत्ती खैरे- मुख्य शिपाई, दीपक नारायण टिल्लू- मुख्य शिपाई, राजेश तुकारामजी पैदलवार- मुख्य शिपाई, श्रीकृष्ण गंगाराम हिरपूरकर-सहाय्यक कमांडंट, राजू संपत सुर्वे-निरीक्षक,संजीव दत्तात्रेय धुमाळ- निरीक्षक, अनिल उत्तम काळे-सहाय्यक उपनिरीक्षक, मोहन रामचंद्र निखारे- सहाय्यक उपनिरीक्षक, द्वारकादास महादेवराव भांगे-सहाय्यक उपनिरीक्षक, अमितकुमार माताप्रसाद पांडे- उपनिरीक्षक यांचा समावेश आहे.