क्राइमक्राइम स्टोरीमहाराष्ट्र

अटल सेतूवर थरार, महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

प्रसंगावधान राखत कॅब ड्रायव्हरनं केस धरले

मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतू सी लिंकवर एका ५६ वर्षीय महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओत दिसते की, एक महिला पुलावरून समुद्रात उडी मारत होती. मात्र, टॅक्सी चालकाने प्रसंगावधान राखत तिचे प्राण बचावले. सीसीटिव्हीमध्ये संपूर्ण प्रकार कैद झाला आहे.

शुक्रवारी सायंकाळी सात वाजता मुबंईवरून नवी मुंबईकडे येणाऱ्या लेनवर गाडीतून उतरून देवाचे फोटो विसर्जित करण्याच्या बहाण्याने ब्रीजच्या रेलिंग वरून आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केला. परंतु कॅब चालकाने तिचे केस धरुन ठेवले तेवढ्यात न्हावा शेवा वाहतूक शाखेचे पोलिस तिथे आले आणि त्यांनी कॅब चालकाच्या मदतीने तिचा जीव वाचवला. तर मी आत्महत्या करत नव्हते तर देवांचे फोटो समुद्रात फेकत असताना माझा तोल गेल्याचे संबंधित महिलेने पोलिसांना सांगितले.

संबंधित महिला आधी ऐरोली पुलावर गेली होती. परंतु, तिच्या अध्यात्मिक गुरुंनी खोल समुद्रात हे देवांचे फोटो फेकायला सांगितले. त्यामुळे ती अटल सेतूवर आली. अटल सेतूवर पोहोचल्यानंतर ती एक एक फोटो समुद्रात टाकत होती. तेवढ्यात तिला वाहतूक पोलिसांच्या जीपचा आवाज आला आणि तिचा तोल गेला. त्यामुळे ती पडली. याच काळात कॅब चालकाला संशय आल्याने ती फोटो टाकत असताना तो रेलिंगच्या अलीकडेच उभा होता. जेव्हा ती खाली पडली तेव्हा कॅबचालकाने तिच्या केसांनी तिला पकडून ठेवले. तेवढ्यात वाहतूक पोलीस आले आणि तिची सुटका केली, अशी माहिती न्हावा शेवा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी दिली.

आत्महत्येचा प्रयत्न करणारी ५६ वर्षीय महिला मुलूंड येथे राहणारी असून रीमा पटेल असे तिचे नाव आहे. वाहतूक पोलीस कर्मचारी ललित शिरसाठ, किरण मात्रे, यश सोनवणे, मयूर पाटील या चौघांनी महिलेचे प्राण वाचवले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button