क्राइममहाराष्ट्र

तरूणाच्या जाचाला कंटाळुन विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर : गावातील मुलगा मागील एक वर्षापासून बळजबरीने मैत्री कर,मला भेटायला ये या एकतर्फी प्रेमातून तरुणाकडून सतत त्रास दिला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. एवढच नाही तर माझ्यासोबत बोल आणि प्रेम कर अन्यथा आत्महत्या करेल अशी धमकी सुद्धा दिली. त्यामुळे घाबरलेल्या तरूणीने गळफास घेत आत्महत्या केली. २५ जुलैला हा प्रकार घडला होता. याप्रकरणी मंगळवारी ३० जुलैला मुलीच्या मावशीच्या तक्रारीवरून एकतर्फी प्रेम करून त्रास देणार्या मजनुविरूध्द सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली. गायत्री बाबासाहेब दाभाडे (२१, रा. जानेफळ ता. वैजापुर) असे मृत तरूणीचे नाव आहे तर दत्तु बाबासाहेब गायके (२३, रा. जानेफळ ता. वैजापुर) असे आरोपीचे नाव आहे.

गायत्रीचे वडील शेतकरी असून ती एन-५ सिडको भागातील फोस्टर कॉलेजमध्ये बीएचएमएसच्या दुसर्या वर्षाला शिक्षण घेते. तीच्या गावातील असलेला आरोपी दत्तु गायके हा मागील वर्षापासून मोबाइलवर फोन करून त्रास देत होता. २५ जुलैला सुध्दा दत्तुने गायत्रीला फोन करून त्रास दिल्याने तीने सिडको मधील मातादी हॉस्टेलमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. गायत्रीने तीच्या मावशीला मार्च २०२४ मध्ये दत्तुची तक्रार केली होती. त्यावरून मावशीने दत्तुला चांगलीच तंबी दिली होती. तरी सुध्दा तो ऐकायला तयार नव्हता. सतत तीच्या मोबाईलवर एसएमएस व फोन करून त्रास देत असल्याने तीने टोकाचे पाउल उचलले. याप्रकरणी तीच्या मावशीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तीन तासाच्या आत आरोपीला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button