उद्धव ठाकरे कन्फ्युज्ड, सभापतीपदासाठी अर्ज केल्यानंतर राम शिंदे यांची प्रतिक्रिया
नागपूर : राम शिंदे यांनी आज (दि.१८) विधान परिषद सभापतीपदासाठी अर्ज दाखल केला. त्यानंतर ते विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे हे कन्फ्युज्ड आहे.
मी विधानसभेची निवडणूक हरल्यानंतरही माझे नाव मंत्री, प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत होते. माझ्या पक्षाला माझ्यावर विश्वास असल्यामुळे त्यांनी मला योग्य सन्मान दिला. त्यांनी दिलेल्या या संधीचे मी नक्कीच सोने करेल, अशी भावना भाजप आमदार राम शिंदे यांनी व्यक्त केली. शिंदे यांनी आज (दि.१८) विधान परिषद सभापतीपदासाठी अर्ज दाखल केला. त्यानंतर ते विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
यानिमित्ताने विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती पदावरही भाजपचे वर्चस्व सिद्ध झाले. या पदावर शिवसेनेचा डोळा होता. महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी विधान परिषदेचा सभापती म्हणून माझ्या नावाची शिफारस केली. परिषदेचा सभापती बिनविरोध निवडून यावा, अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. विरोधकांनीही मान ठेवत माझ्या निवडीला पाठिंबा दिला. महायुती आणि विरोधकांचे आभार मानतो. राजकारणात चर्चा महत्त्वाची आहे, यावर शिंदे (Ram Shinde) यांनी भर दिला.
कुणाचाही अहंकार कधीही फार काळ टिकत नाही. एक ना एक दिवस तो नष्ट होतोच. एकतर मी राहील नाही तर देवेंद्र फडणवीस राहतील, अशी अहंकाराची भाषा बोलणाऱ्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अहंकार काल गळून पडल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहे. काल ते स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले आणि त्यांची भेट घेतली. त्या भेटीदरम्यान त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी चर्चेत केली. आज दारुण पराभवानंतर त्यांना सावरकर, हिंदुत्व आठवत आहे. ते पूर्णत: कन्फ्युज्ड आहेत, अशी टीका भाजपचे आमदार राम कदम यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केली.