
रायगडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे मागासवर्गीय निवासी शाळेत एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलीस याची चौकशी करत आहेत.
अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यात आला. यातील आरोपीदेखील अल्पवयीन मुले आहेत. माणगावच्या जावळी येथील मागासवर्गीय निवासी शाळेतून हा गंभीर प्रकार समोर आलाय. ही घटना घडेपर्यंत शिक्षक, इतर कर्मचारी कुठे असतात? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतायत.
आपल्यावर अत्याचार झाल्याचा प्रकार पीडित विद्यार्थ्याने शिक्षकांना सांगितला.यानंतर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. दरम्यान तीनही मुलांना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.