मनोरंजनमहाराष्ट्रराजकारण

सरकार भेदभाव करते, पण खड्डे नाही… व्हीडिओसह विवेक अग्निहाेत्रींची खाेचक पाेस्ट

मुंबई – रस्त्यावरील खड्ड्यातून जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा व्हिडीओ शेअर करत सिनेदिग्दर्शक विवेक अग्निहाेत्री यांनी साेशल मिडीयावर खाेचक पाेस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटले की, मुंबईचे रस्ते… हा आहे महाराष्ट्र मुख्यमंत्र्याच्या गाडीचा ताफा, ज्यात लेक्सपासून क्रेटासारख्या लक्झरी गाड्यांचा समावेश आहे. सरकार सामान्य जनतेबाबत भेदभाव करू शकते. पण खड्डे मात्र मुख्यमंत्री व सामान्य जनता यात कुठलाही भेद करत नाही.

विवेक अग्निहाेत्री यांची ही खाेचक पाेस्ट नेटकèऱ्यांनी चांगलीच व्हायरल केली आहे. मुंबईतीलच नाही तर राज्यातील सामान्य जनता खड्ड्यांना चांगलीच वैतागली आहे. यावर यापुर्वीही अनेक नेटकऱ्यांनी सेलिब्रिटींनी साेशल मिडीयावर टिका केलेली आहे. विवेक अग्निहाेत्रीच्या पाेस्टसाेबतच त्यांची जुनी पाेस्टही व्हायरल हाेत आहे. ज्यात त्यांनी बीएमसीला टॅग करत अनाेखा असा खाेचक सल्ला दिला हाेता. त्यात त्यांनी लिहिले हाेते की, गाड्यांना खड्डयांपासून वाचवायचे असेल तर मुंबई महानगरपालिकाने प्रत्येक खड्डयांच्या बाजूला एक पाटी लावावी व त्या पाटीवर खड्ड्यांची खाेली लिहावी, म्हणजे त्यातून गाडी कशी चालवावी याची कल्पनना चालकांस येईल. वादग्रस्त पाेस्ट करण्याबाबत विवेक अग्निहाेत्री हे प्रसिध्द आहेत. पण यावेळेस त्यांनी सामान्य जनतेच्या अडचणीची पाेस्ट केल्याने त्यांची पाेस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button