
नवी दिल्ली : तंत्रज्ञान आज प्रत्येक क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावत आहे. अशातच, तंत्रज्ञान क्षेत्रातील AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजेंसमुळे मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. एआय तंत्रज्ञान गुन्हेगारांना पकडण्यात मदत करत आहे. असेच एक AI मॉडेल म्हणजे Crime GPT, जे गुन्हेगारांचे शत्रू बनले आहे. हे उत्तर प्रदेश पोलिसांच्या सहकार्याने गुरुग्राम येथील एआय स्टार्टअप Staqu टेक्नॉलॉजीने तयार केले आहे. हे एका भाषाआधारित मॉडेल आहे.
असे करते काम
गुन्हेगारासंबंधीत माहिती अल्पावधीत मिळविण्यासाठी क्राइम जीपीटीची रचना करण्यात आली आहे. तसेच, हे एआय मॉडेल गुन्हेगारावर नजर ठेवण्यास आणि त्याला कोठडीत ठेवण्यास मदत करते. क्राइम GPT हे गुन्हेगारांच्या डेटाबेसने इंटीग्रेट केले आहे, लॉ इन्फोर्समेंट एजेंसी Crime GPT ला अक्सेस करुन गुन्हेगारांची ओळख पटवू शकतात.
9 लाख गुन्हेगारांचा डाटा
उत्तर प्रदेशपुरताच विचार केला तर क्राइम जीपीटीवर सुमारे 9 लाख गुन्हेगारांचा डाटा आहे. या सर्व गुन्हेगारांच्या नोंदी कोणत्याही ठिकाणी सहज मिळू शकतात. पोलिसांच्या डेटा सेंटरमध्ये Staquटेक्नॉलॉजीद्वारे होस्ट केलेल्या यूपी पोलिसांच्या सर्व्हरवर एआय समर्थित टूल विकसित केले गेले आहे. CrimeGPT द्वारे CCTV फीडमधून डिजिटल डेटाचे विश्लेषण केले जाऊ शकते. यात ऑडिओ, प्रतिमा, मजकूर आणि फाइल्सचा समावेश आहे.
गुन्हेगार पकडले जातील
हे तंत्रज्ञान नागपूर पोलिसांनीही कार्यान्वित केले असून त्याला सिम्बा असे नाव देण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाद्वारे सुमारे 1.50 लाख गुन्हेगारांचा डेटा तपासला जाणार आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांची ओळख पटवली जाईल. यामध्ये स्पीकर आयडेंटिफिकेशन आणि फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.