सासऱ्याने का दिली? सुवर्णपदक विजेत्या अर्शदला म्हैस भेट!

लाहाेर : ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानाच्या अर्शद नदीमने भालाेकीत सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर त्याच्यावर राेख पुरस्कार आणि इतर माैल्यवान बक्षिसांचा वर्षाव आता हाेत आहे. त्यात अर्शदला सासरच्यांनी म्हैस भेट दिली आहे. अशी आश्चर्य वाटण्यासारखी अनाेखी भेट का दिली बर दिली असेल.
याबाबत तेथील गावकऱ्यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितले की, म्हैस भेट देणे त्यांच्या गावात अत्यंत माैल्यवान आणि सन्माननीय मानले जाते. अर्शदचे ग्रामीण भागात गेलेले बालपण आणि परंपरा लक्षात घेऊन त्याला म्हैस भेट देण्याचा निर्णय घेतला गेला. पाकिस्तानचा पहिला वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अर्शद नदीमचे मायदेशी परतल्यावर चाहत्यांनी जाेरदार स्वागत केले आणि आपल्या कुटुंबाला भेटताना ताे भावूक झाला. नदीम पाकिस्तानात पाेहाेचल्यावर वाॅटर कॅनन सॅल्यूटने त्याचे स्वागत करण्यात आले. हे राष्ट्रनायकाचे स्वागत हाेते कारण हजाराे चाहते नदीमची एक झलक पाहण्यासाठी आतुर झाले हाेते आणि त्याच्या नावाचा जाेरजाेरात जयघाेष करत हाेते. नदीमने पॅरिस गेम्समधील भालाेक स्पर्धेत 92.97 मीटर अंतर कापून सुवर्णपदक जिंकले हाेते. पाकिस्तानात पाेहाेचल्यावर नदीमने आई, वडील आणि माेठ्या भावाला मिठी मारली. अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या लाउंजमध्ये भावनिक पुनर्मिलनादरम्यान त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना पुष्पहार अर्पण केला.