देश-विदेश

येमेनमध्ये भारतीय नर्सला फाशीची शिक्षा का सुनावली? कोण आहे निमिषा प्रिया?

येमेनचे राष्ट्राध्यक्ष रशाद अल-अलिमी यांनी एका भारतीय नर्सला फाशीची शिक्षा सुनावली आहे. निमिषा प्रिया असे नर्सचे नाव आहे. निमिषा प्रियावर हत्येचा गुन्हा दाखल आहे. त्यात ती दोषी आढळली असून तिला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात निमिषा 2017 पासून येमेनच्या तुरुंगात आहे. मात्र तिला फाशीची होऊ नये, यासाठी तिच्या कुटुंबाकडून खूप प्रयत्न करण्यात आले होते. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

येमेनमधील तुरुंगात गेल्या ७ वर्षापासून शिक्षा भोगत असलेल्या केरळमधील निमिषा प्रिया यांची दया याचिका येमेनचे राष्ट्रपती राशद अल अलीमी यांनी फेटाळून लावत तिच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले आहे. २०१७ पासून निमिषा प्रिया येमेनच्या तुरुंगात बंद आहेत. येत्या महिनाभरात तिला फाशी दिली जाण्याची शक्यता आहे.

येमेनचे राष्ट्रपती राशद अल अमीनी यांनी निमिषा प्रियाची दया याचिका फेटाळून लावत तिची फाशी कायम ठेवल्यानंतर भारत सरकार तिच्या मदतीसाठी पुढं सरसावलं आहे.

निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी सरकारने कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन मंगळवारी दिले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सरकारला या प्रकरणाची माहिती आहे आणि कायदेशीर पर्यायांचा शोध घेण्यासाठी कुटुंबाला मदत केली जात आहे.

निमिषा प्रियाच्या प्रकरणाबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना जयस्वाल म्हणाले की, येमेनमध्ये निमिषा प्रियाला सुनावण्यात आलेल्या शिक्षेची आम्हाला माहिती आहे. आम्हाला समजले आहे की त्याचे कुटुंब योग्य पर्याय शोधत आहे. या प्रकरणी सरकार त्यांना सर्वतोपरी मदत करत आहे. यापूर्वी सोमवारी येमेनचे राष्ट्राध्यक्ष रशाद अल-अलीमी यांनी मूळची केरळची असलेल्या निमिषाला फाशीची शिक्षा सुनावण्याच्या अंतिम आदेशावर स्वाक्षरी केली. एका महिन्याच्या आत तिला मृत्यूदंड दिला जाईल, असे या अहवालात म्हटले आहे.

काय आहे आरोप?
नर्स निमिषा प्रियाला वर्ष 2017 मध्ये यमनचा नागरीक तलाल अब्दो महदीच्या हत्येत दोषी घोषित करण्यात आलं. त्यानंतर एक वर्षानंतर सुनावणी सुरू असताना ट्रायल कोर्टाने तिला मृत्यूची शिक्षा सुनावली. तेव्हापासून निमिषाचे कुटुंबीय तिच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहेत. ट्रायल कोर्टाच्या आदेशाविरोधात तिच्या कुटुंबियांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. परंतु वर्ष 2023 मध्ये त्यांची याचिका फेटाळण्यात आली. यमनच्या राष्ट्रपतींनीही त्यांची याचिका फेटाळून लावली.

कोण आहे निमिषा प्रिया?
निमिषा प्रिया केरळमधील पलक्कड येथील रहिवासी आहे. ती व्यवसायाने नर्स आहे. ती 2008 मध्ये येमेनला गेली आणि काही वर्षे येमेनमधील खासगी रुग्णालयात काम केले. यानंतर 2011 मध्ये तिने टॉमी थॉमसशी लग्न केले आणि दोघांना एक मुलगी झाली, परंतु आर्थिक अडचणींमुळे पती आणि मुलीला 2014 मध्ये भारतात परतावे लागले. मात्र, कुटुंबाला आर्थिक मदत करता यावी म्हणून निमिषा यमनमध्येच राहिली. यानंतर 2015 मध्ये निमिषा आणि येमेनी नागरिक तलाल अब्दो यांनी मिळून क्लिनिक सुरू केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button