पोरासमोरच बायकोचा गळा चिरला, व्हिडीओ बनवला अन् म्हणे माझी लक्ष्मी होती…

पुणेः पुण्याच्या खराडी भागातील एक धक्कादाक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पतीने प्रापर्टी हडपण्याच्या संशयावरून पत्नीची आपल्या मुलासमोरच हत्या केली आहे. एवढ्यावरच न थांबता नराधम पतीने हत्येचे व्हिडिओ शूटिंग केले. यानंतर नराधम पती पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला. ही घटना बुधवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेने पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
ज्योती शिवदास गिते ( वय 28, रा. तुळजाभवानीनगर, खराड ), असं खून झालेल्या महिलेचे नाव आहे. शिवदास तुकाराम गिते ( वय, 37 ), असं आरोपीचं नाव आहे. आरोपी शिवदास याला पोलिसांनी अटक केली आहे.
समोर आलेल्या मिळालेल्या माहितीनुसार,आरोपी शिवदास गिते हा मुळचा बीड जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो पुण्याच्या खराडी परिसरातील तुळजाभवानी नगर परिसरात भाड्याच्या घरात राहत होता. तो पुणे जिल्हा सत्र न्यायालयात टंकलेखक म्हणून काम करत होता. काही दिवसांपूर्वी त्याला नोकरीवरून काढून टाकलं होतं, अशी माहिती देखील समोर आली आहे. दारूच्या व्यसनामुळे आरोपी शिवदास गिते सतत पत्नीसोबत वाद घातल होता.
पहाटे पत्नीने उठवल्याचा रागातून हत्या
पहाटे पत्नीने उठवल्याचा रागातून आरोपीने ही हत्या केल्याची माहिती आहे. मुलाला खूर्चीवर बसवून पतीने पत्नीचा गळा चिरला. त्यानंतर त्याने आपण ही हत्या सेल्फ डिफेन्समध्ये केल्याचं म्हटलं. त्याचा व्हिडीओ काढून त्याने व्हॉट्स अॅप ग्रुपवर शेअर देखील केला होता. घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने ज्योती यांना ससून रुग्णालयात दाखल केलं. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. रुग्णालयात जाता डॉक्टरांनी ज्योती यांना मृत घोषित केलं.
आरोपीला अटक
दरम्यान, आरोपी शिवदास गिते हा सस्पेंड होता, त्यामुळे त्याची पत्नी त्याला सकाळी चार वाजता अभ्यासाला उठवायची. परंतू पत्नीने उठवल्याचा राग आल्याने त्याने हे धक्कादायक कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस या प्रकरणात अधिकची माहिती घेत आहेत.
व्हिडिओत शिवदास काय म्हणतोय?
“माझी लक्ष्मी होती. पण, मला मारण्याचा प्रयत्न केला, हे फार उशीरा कळलं. हीचे लक्षणे बरोबर नव्हती. मी पण माणूसच आहे. माझ्या संरक्षणासाठी मला वाईट करण्याची वेळ आली. हिला मारण्याची माझी इच्छा नव्हती. तिने एका मुलाला जन्म दिला आहे. मला मारण्याचा प्रयत्न करती? माझ्या मुलाचं भविष्य पाहण्यासाठी मला हिला मारावे लागले. माझा नाईलाज होता. कुठलाही पर्यायच ठेवला नव्हता माझ्यासमोर… मला मारून टाकण्याचा प्रयत्न केला. हीने पुण्यात माणसे सुद्धा पेरली आहेत… 100 टक्के पेरलेली आहेत. भांडी घासण्याच्या कामाला जात होती की प्लॅन करण्यासाठी जात होती… यात लेकराचा काय गुन्हा आहे… त्यालाही मारण्याचा प्रयत्न केला असेल… मी आजपर्यंत कोणताही गुन्हा केला नाही. मला मजबूर करण्यात आले,” असं शिवदास व्हिडिओत म्हणताना दिसतोय.