Yeah, Yeah करायला हे काही कॉफी शॉप नाही, सरन्यायाधीशांनी वकीलांला झापले

नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सुनावणीदरम्यान एका वकिलाला फटकारले आहे. हे वकील माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधात अंतर्गत चौकशी करण्याची मागणी करत होते. ते याचिकेबाबत बोलताना सरन्यायाधीशी Yeah, Yeah, Yeah शब्दाचा वापर करत होते. अशा अनौपचारिक शब्दाचा वापर केल्याबद्दल त्यांनी वकिलाला हे “हे कॉफी शॉप नाही,” असे फटकारले.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले, “हे काही कॉफी शॉप नाही, मला तुमच्या या ‘Yeah, Yeah, Yeah’ ची अॅलर्जी आहे. न्यायालयात अशा व्यवहाराची अनुमती देता येणार नाही. Yeah म्हणण्यापेक्षा Yes’ म्हणा. सरन्यायाधीशांनी ऐकवल्यानंतर त्यांनी माफी मागितली व त्यांचा मुद्दा मांडण्यास सुरुवात केली. या वकिलाने २०१८ मध्ये माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधात इन-हाऊस (अंतर्गत) तपास करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. CJI Chandrachud |
सरन्यायाधीश वकिलास म्हणाले, “न्यायमूर्ती गोगोई हे आता निवृत्त न्यायाधीश आहेत, त्यामुळे हे न्यायालय आता चौकशीचे आदेश देऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेली समीक्षा याचिका यापूर्वीच फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे याचिकाकर्त्याला क्युरेटिव्ह याचिका दाखल करावी लागेल. ही कलम ३२ अंतर्गत दाखल केलेली याचिका आहे का? तुम्ही प्रतिवादी म्हणून न्यायाधीशांसमोर जनहित याचिका कशी काय दाखल करू शकता?” असा सवाल केला.
त्यावर वकील म्हणाले, “गोगोई यांनी एका वक्तव्याच्या आधारावर माझी याचिका फेटाळली होती. माझी त्यात काहीच चूक नव्हती. मी न्यायालयाला विनंती केली होती की माझी समीक्षा याचिका कामगार कायद्यांची माहिती असलेल्या खंडपीठासमोर मांडावी. परंतु, तसं झाले नाही. त्यांनी ती याचिका थेट फेटाळली”.
त्यावर चंद्रचूड यांनी मूळ याचिका दाखल करून त्यातून गोगोई यांचं नाव हटवण्यास सांगितले. त्यानंतर या याचिककडे लक्ष देऊ, असे सांगितले.