तरूणाच्या शरीरावर २२ वार; राजकीय वादातून खून
गावठी पिस्तुलासह दोन जणांना घेतले ताब्यात; गुन्हा दाखल
पिशोर : राजकिय वादातून एका तरूणावर धारदार शस्त्राने तब्बल २२ वार करून खून केल्याची घटना कन्नड तालुक्यातील पिशोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करंजखेड पोलीस चौकीच्या हद्दीत करंजखेड शिवारात गुरुवारी सकाळी उघडकीस आली. नीलेश कैलास सोनवणे ( ३३) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की मयताची आई संगीताबाई कैलास सोनवणे या करंजखेड येथे सरपंच पदावर कार्यरत असून यांच्या मुलाचा खून झाल्याची तक्रार मयताची आई संगीताबाई सोनवणे यांनी पिशोर पोलीस ठाण्यात येऊन दिली. तक्रारीत म्हटले की करंज खेड येथे सरपंच पद हे राखीव असल्याने मी सरपंच पदी नियुक्ती झाली तेव्हा आमच्या गावातील भगवान काशीराम कोल्हे, यांना राग आला होता. कारण मी त्यांच्या उमेदवाराला पराभूत करून निवडून आले होते. त्यांच्या मनात राग होता. त्या रागातून ते मला व माझ्या परिवाराला वारंवार त्रास देत होते २०२२ मध्ये यात्रेमध्ये नारळ फोडण्यावरून झालेल्या वादात भगवान कोल्हे व इतर यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याने मी पिशोर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.दिनाक २५/७/२४ रोजि माझा मुलगा आकाश संभाजीनगर वरून गावाकडे आला होता. तो त्याच्या मित्राला मोटरसायकल वरून सोडून येत असताना रस्त्यात मयूर सुभाष सोळुंके, विजय बापू वाघ, यांनी जुन्या भांडणाच्या वादावरून वाद घातला होता. परंतु मी त्याबाबतची तक्रार पोलीस स्टेशनला दिली नव्हती.
गुरुवारी सकाळी माझा मुलगा निलेश नेहमीप्रमाणे शेतात गुरांना चारापाणी करण्यासाठी सहा वाजता जात असे पंधरा-वीस मिनिटांने घरी येत असे परंतु आज सात वाजेपर्यंत तो घरी न आल्याने मी व माझे पती त्याला शेताकडे बघण्यासाठी गेलो असता. मयूर सुभाष सोळुंके, विजय बापू वाघ, व इतर चार जण हे सर्व गावाकडे जाताना दिसले त्यानंतर आम्ही पुढे जाताना आमच्या शेताशेजारी राहणाऱ्या सुभद्रा बाई गोविंदा मुरारी या भेटल्या व म्हणाल्या तुमची मोटरसायकल तुमच्या बांधाच्या कडेला पडलेली दिसली आम्ही तिथे जाऊन बघितले तर माझा मुलगा निलेश मकाच्या शेतात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. आम्ही आरडाओरडा केल्यावर आजूबाजूचे राहणारे लोक जमा झाले. पिशोर पोलीस ठाण्यात मयताची आई संगीताबाई सोनवणे यांच्या तक्रारीवरून मयूर सुभाष सोळुंके, विजय बापू वाघ, व इतर चार जनाविरुद्ध कलम १०३बी.एन.एस नुसार व अनुसूचित जमातनुसार पिशोर पोलीस ठाण्यात यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची घटनेची माहिती मिळताच पिशोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव नागवे. दुय्यम अधिकारी रतन डोईफोडे, रायटर विलास सोनवणे, बीट जमादार लालचंद नागलोत ,गोपनीय अमलदार संजय लगड ,संजय दराडे, गणेश कवाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली .
यावेळी फिंगर प्रिंट पथक यांना प्राचारण करण्यात आले ए.पी.आय. ए.एम .पठाण कर्मचारी पी. एस. आढे, बाविस्कर, तसेच पिंक पथक चे पी.एस.आय. सोमनाथ टापरे, कदिर पटेल , अमोल गायकवाड, रमेश छत्रे, या सर्व टीमने घटनेचा पंचनामा करून मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्र करंजखेड येथे डॉ. श्रीकांत तुपे यांनी मृतदेहाचे शविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
तरुणाच्या शरिरावर तब्बल चाकुचे २२ वार
डॉ .श्रीकांत तुपे यांनी सांगितले की, धारदार शस्त्राने मयताच्या अंगावर २२ वार केलेले आहे. गावठी पिस्तुलच्या बुलेटचे निशान नाही. असे त्यांनी सांगितले. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की आमच्याकडे दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्या जवळील गावठी पिस्तूल ताब्यात घेतलेले आहे. उपविभागीय अधिकारी विजयकुमार ठाकूर वाड कर्मचारी नीलकंठ देवरे व जीवन नोंदवाल यांनी घटनास्थळी भेट दिली.