मनोरंजन

‘मौत का कुआ’मध्ये दमदार रॅपिंग, आनंद महिंद्राही झाले चाहते, शेअर केला सूरज चेरुकटचा रॅप व्हिडिओ

नवी दिल्ली : आनंद महिंद्रा हे देशातील मोठे उद्योगपती असून ते महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आहेत. खूप व्यस्त असूनही ते विविध विषयांवर मत व्यक्त करत असतात. कलेचीही त्यांना प्रचंड आवड आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते लोकांना खासकरुन कलाकारांना प्रोत्साहन देत असतात. नुकतेच त्यांनी सोशल मीडियावर सांगितले की ते देशी रॅपचे चाहते आहेत. भारतीय वंशाच्या अमेरिकन रॅपर्सच्या प्रतिभेची त्यांनी लोकांना ओळख करून दिली.

आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर टॅलेंटेड रॅपर सूरज चेरुकटचे कौतुक केले आहे. त्यांनी प्लॅटफॉर्मवर लिहिले आहे की, आपला सूरज चेरुकट आहे, जो जगभरात आपली छाप पाडत आहे. रॅप प्रत्येकासाठी नसेल, पण केरळचा हा मुलगा बेंगळुरू ते टेक्सासपर्यंत त्याच्या स्फोटक आवाजाने अमेरिकेचे लक्ष वेधून घेत आहे. तो विशेषतः त्याच्या ‘बिग डॉग्स’ या ताज्या व्हिडिओसाठी चर्चेत आहे, जो  ‘वेल ऑफ डेथ’मध्ये दाखवण्यात आला आहे. आमच्या लहानपणी यास ‘मौत का कुआं’ म्हणून ओळखले जायचे.

 

View this post on Instagram

 

A post shared by hanumankind (@hanumankind)

आनंद महिंद्रा रॅपर डिव्हाईनचे फॅन
आनंद महिंद्रा यांनी पोस्टमध्ये तरुणांच्या प्रतिभेचे कौतुक केले आणि लिहिले, ‘असे दिसते की असे कोणतेही संगीत नाही जे तरुण भारतीयांना परिचित नाही.’ महिंद्रा यांनी रॅपर काही दिवसांपूर्वी रॅपर डिव्हाईनचा फोटो पोस्ट केला होता आणि स्वत:ला त्याचा चाहता असल्याचे सांगितले होते. त्यांनी त्याला एक थार कारही भेट दिली होती. फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, ‘मी देखील रॅपर डिव्हाईनचा चाहता आहे.

सूरज चेरुकटच्या रॅपिंगवर लोक फिदा
व्हिडिओमध्ये सूरज चेरुकट मौत का कुआमध्ये जोरदार रॅप करताना दिसत आहे. त्याने हा रॅप अशा लोकांना समर्पित केला आहे जे धोका पत्करून जीवन जगत आहेत. त्याचे रॅपिंग लोकांना खूप आवडते. एक यूजर्स लिहितो, ‘हे अप्रतिम आहे.’ दुसरा यूजर्स लिहितो, ‘सेट इट ऑन.’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button