इतर

केजरीवालाची ऑटोचालकांसाठी मोठी घोषणा… विमा, पाल्याच्या शिक्षण-लग्नांसाठी मोठा निधी

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने जोरदार तयारी केली आहे. प्रत्येक घटकाला डोळ्यासमोर ठेवून पक्ष पुढे जात आहे. सोमवारी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पहिली हमी जाहीर केली. केजरीवाल यांची पहिली हमी ऑटो चालकांसाठी आहे. यामध्ये वाहनधारकांचा विमा, मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत, मुलांच्या कोचिंगचा खर्च उचलणे, गणवेशाच्या खर्चासाठी निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी ऑटो चालकांना घरी बोलावले, त्यांना चहा दिला आणि त्यांच्याशी दीर्घ चर्चा केली. यानंतर अरविंद केजरीवाल म्हणाले होते, ऑटो चालक बंधूंसोबत माझे नाते माझ्या हृदयाच्या जवळचे आहे. मी काल त्यांना माझ्या घरी चहासाठी बोलावले आणि त्यांच्याशी खूप बोललो.

एका भावाने मला त्यांच्या घरी जेवायला बोलावले. आज मी दुपारी त्यांच्या घरी जेवायला जाणार आहे हे नातं रामलीला मैदानापासून सुरू झालं आणि अजूनही आहे. विशेष म्हणजे दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार असून पुढील वर्षी फेब्रुवारीपूर्वी निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत आम आदमी पार्टी सतत तयारीत व्यस्त आहे.

विधानसभेआधी दिल्लीतील रिक्षा चालकांसाठी काय आहे पहिल्या गॅरेंटीची घोषणा?
– दिल्लीत रिक्षा चालकांसाठी १० लाखांचा आरोग्य विमा असेल
– रिक्षा चालकाच्या मुलीच्या लग्नासाठी १ लाख रुपयांची आर्थिक मदत
– वर्षातून दोन वेळा ऑटो चालकांचे युनिफॉर्म अर्थात वर्दीसाठी २५०० रुपये रिक्षा चालकांच्या बँक खात्यात दिले जाणार
– रिक्षा चालकांच्या मुलांच्या कोचिंगचा खर्च सरकार करणार

पूछो ॲप पुन्हा सुरू करण्याचं आश्वासन, काय आहे हे ॲप?
अरविंद केजरीवाल यांनी पूछो ॲपची पुन्हा सुरुवात करण्याचं आश्वासनही दिलं आहे. पूछो ॲप दिल्ली इंटिग्रेटेड मल्टी-मॉडेल ट्रान्झिट सिस्टमद्वारे विकसित केलेल्या डेटाबेसपर्यंत पोहोचण्यास मदत करतं. यामुळे लोकांना नोंदणीकृत ऑटो चालकांना कॉल करण्याची परवानगी मिळते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button