क्राइममहाराष्ट्र

संविधान प्रतिकृतीची विटंबनाप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

आरपीआय (आ) कडून सांगोला पोलीस निरीक्षक यांना निवेदन

सांगोला : प्रतिनिधी-

परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळील संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा , या इतर मागणीसाठी सांगोला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) यांच्यावतीने जाहीर निषेध करून घोषणा देत दिनांक १६ डिसेंबर रोजी सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भीमराया खणदाळे यांना निवेदन देण्यात आले.
सदरचे आंदोलन हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रिय सामाजिक न्याय राज्य मंत्री मा. ना. रामदासजी आठवले यांच्या आदेशाने व महाराष्ट्र राज्य प्रदेश मा. राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला तालुका आरपीआय (आ) पक्षाच्यावतीने करण्यात आले.
परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, सदरचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, संविधान रक्षकावर दाखल केलेले गुन्हे शासनाने मागे घ्यावेत, शहीद भिम सैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा. तसेच सूर्यवंशी यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन शासनाने त्वरीत करावे, आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
यावेळी तालुका अध्यक्ष खंडू (तात्या) सातपुते, जिल्हा कार्याध्यक्ष विक्रम शेळके, जिल्हा उपाध्यक्ष दिगंबर गवळी, बापूसाहेब बनसोडे माजी युवक जिल्हा अध्यक्ष , जिल्हा संघटक राजा मागाडे , जिल्हा सचिव रवी बनसोडे , रत्नदीप मागाडे यांच्या सह मोठ्या संख्येने आरपीआयचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button