…तर पुरुषांना दोन लग्न करण्याची परवानगी द्यावी लागेल : गडकरी
नवी मुंबई : देशातील लिंग गुणोत्तर राखण्याची गरज आहे. जर 1,500 स्त्रिया आणि फक्त 1,000 पुरुष असतील अशी वेळ आली तर पुरुषांना दोन लग्न करण्याची परवानगी द्यावी लागेल, असे मत केंद्रीय नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. तसेच लिव्ह इन रिलेशनशिप योग्य नाही, असे म्हणत त्यांनी या नातेसंबंधांना विरोध केला. लिव्ह इन रिलेशनशिपबद्दलचा ब्रिटन दौऱ्यातील अनुभवही नितीन गडकरी यांनी सांगितला. एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत गडकरींनी या मुद्द्यावर सविस्तर भाष्य केले.
मुलाखतीत नितीन गडकरी यांना लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल तुमचं मत काय आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना गडकरी म्हणाले, “लिव्ह इन रिलेशनशिप चुकीचं आहे. मी लंडनला गेलो होतो ब्रिटिनच्या संसदेत. पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्र्यांना भेटलो. त्यांनी मला विचारलं की, तुमच्या देशात सर्वात मोठी समस्या कोणती आहे? तेव्हा मला समजले की युरोपीय देशांतील सर्वात मोठी समस्या म्हणजे स्त्री-पुरुष विवाहात रस घेत नाहीत आणि लिव्ह इन रिलेशनशिपला प्राधान्य देतात.”
.तर समाजरचना संपेल’
केंद्रीय मंत्री गडकरी यांना विचारण्यात आले की या प्रवृत्तीचा (लिव्ह-इन आणि समलैंगिकता) समाजावर काय परिणाम होईल? त्यावर मंत्री म्हणाले, ‘लग्न केले नाही तर मुले कशी होणार? त्या मुलांचे भविष्य काय असेल? समाजरचना उद्ध्वस्त केली तर त्याचा लोकांवर काय परिणाम होईल?
‘मुलांचे संगोपन करणे हे पालकांचे कर्तव्य’
नितीन गडकरी म्हणाले, ‘प्रश्न हा नाही की भारतात कमी किंवा जास्त मुले निर्माण करण्याची गरज आहे. मुद्दा असा आहे की मुले जन्माला घालणे आणि त्यांचे योग्य पालनपोषण करणे हे पालकांचे कर्तव्य आहे. तुमच्याकडे मौजमजेसाठी मुलं आहेत आणि जबाबदारी घ्यायची नाही असं तुम्ही म्हणत असाल तर ते योग्य नाही.