खातेवाटपानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेवून धनंजय मुंडेची खास पोस्ट
मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीला भरघोस जागा िमळाली. पण मुख्यमंत्री कोण होणार यात महायुतीचा बराच काळ केला. नंतर मुख्यमंत्री म्हणून देवंेद्र फडणवीस आल्यानंतर मंत्रीपदासाठी अनेक अडचणी आल्या. त्यानंतर गृहखातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आले तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थखातं कायम आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा निर्घूनपणे खून प्रकरणी चर्चेत असलेले अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडेही चांगले खाते देण्यात आले आहे. दरम्यान, खातेवाटप जाहीर होताच धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट केली असून यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे.
राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी माझ्यावर सोपवल्या बद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यंत्री तथा आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय खा.…
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 21, 2024
महायुतीच्या नवीन मंत्रिमंडळाच्या खातेवाटपात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खातं देण्यात आले आहे. यानंतर धनंजय मुंडेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत सर्वांचे आभार मानले आहेत. राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी माझ्यावर सोपवल्या बद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री वेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यंत्री अजित पवार, आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांसह सर्व पक्षश्रेष्ठींचे मनापासून आभार व्यक्त करतो, असं धनजंय मुंडे पोस्टद्वारे म्हणाले. राज्यातील जनतेशी थेट निगडित हे खाते असल्याने मी माझी जबाबदारी चोखपणे पार पाडून माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरवून दाखवेन, असं धनंजय मुंडेंनी सांगितले.
संतोष देशमुखांच्या हत्येमुळे मुंडेंच्या नावाची चर्चा
बीड जिल्ह्याच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा निर्घूनपणे खून करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेचे पदासाद सर्वत्र पडले. या घटनेचा खरा सूत्रधार वाल्मिक कराड हा असून तो धनंजय मुंडे यांच्या जवळचा असल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात सहभाग होणार कीनाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र काल झालेल्या खातेवाटपामध्ये धनंजय मुंडेंना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.