मस्साजोग सरपंच हत्याकांड : सुदर्शन घुलेविरोधात आणखी पुरावे पोलिसांच्या हाती; SITकडून कोठडीची मागणी
केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याच्याविरोधातील आणखी पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सुदर्शन घुलेची पोलीस कस्टडी मिळवण्यासाठी एसआयटीने बीडच्या न्यायालयात अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात आणि खंडणी प्रकरणांमध्ये सुदर्शन घुले याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर सुदर्शन गुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ही मिळाली होती. आता एसआयटीला पोलीस कोठडी मिळावी असा अर्ज मकोका कोर्ट विशेष न्यायाधीश सुरेखा आर पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. त्याद्वारे पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.
9 डिसेंबर 2024 रोजी सरपंच संतोष देशमुख यांचे घटनास्थळावरून दुपारी 3 ते 3.15 च्या दरम्यान अपहरण झाले. यावेळी वाल्मीक कराडशी सहआरोपी सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे या दोघांचे दूरध्वनी वरून संभाषण झाले. त्यानंतर मस्साजोग मांजरसुंबावरील डोनगाव फाटा टोल नाक्याजवळ संतोष देशमुख यांचा खून झाल्याचे आढळून आले. त्यानंतर 29 नोव्हेंबर 2024 मधील कथित सीसीटीव्ही फुटेज तपासले गेल्यानंतर वाल्मीक कराडसह विष्णू चाटे सुदर्शन घुले आणि सरपंच अपहरण आणि खून प्रकरणाचा संबंध असल्याचे SIT ला दिसून आले होते. आता सुदर्शन घुलेबाबत एस आय टी ला नवे पुरावे सापडले असून बीड न्यायालयाकडे SIT ने सुदर्शन गुलेची पोलीस कस्टडी मिळवण्यासाठी अर्ज केला आहे .
संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेची पोलीस कस्टडी मिळवण्यासाठी एसआयटीकडून बीड न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आलाय . आरोपी सुदर्शन घुले संदर्भात काही पुरावे सापडल्यामुळे एसआयटी ला सुदर्शन घुलेची पोलीस कस्टडी हवी आहे .या संदर्भातला अर्ज मकोका कोर्ट विशेष न्यायाधीश सुरेखा आर पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. मुख्य आरोपी सुदर्शन घुले हा संतोष देशमुख हत्याकांडामध्ये आणि खंडणी प्रकरणांमध्ये मुख्य आरोपी आहे. त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाईही झाली आहे.
सुदर्शन गुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली होती. यावेळी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी पोलीस कोठडीचा अधिकार अबाधित ठेवावा असे स्पष्टपणे सांगण्यात आले होते. गरज पडल्यास आरोपी सुदर्शन घुलेसह इतर आरोपींना पोलीस कोठडी मागण्याचा अधिकार अबाधित ठेवावा असेही यात म्हटले होते. दरम्यान सरपंच संतोष देशमुख हत्याकांड आणि मकोका अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील बीड जिल्हा न्यायालय मध्ये हजर आहेत .सरकारी पक्षाकडून वकील बाळासाहेब कोल्हेही हजर राहतील .आरोपीचे वकील तिडकेही बीड जिल्हा न्यायालयात हजर राहणार आहेत