क्राइममहाराष्ट्र

कराड यांच्यावर उपचार करणारे सिविल सर्जन अंजली दमानियांच्या रडारवर

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा देण्याच्या मागणी राज्यभरातून केली जात आहे. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सातत्याने नवे खुलासे करत आहे. यातच आता अंजली दमानिया यांनी वाल्मीक कराडवर उपचार करणाऱ्या सिव्हिल सर्जन डॉ. अशोक थोरात यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अंजली दमानिया यांनी बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्या संदर्भात एक्सवर पोस्ट केली.

ज्यात अंजली दमानिया यांनी हॉटेल पियुष इन हे अंबेजोगाई येथील होटल कोणाचे आहे? मला अशी माहिती मिळतेय की डॉ. अशोक थोरात यांचे आहे. हे बीड रुग्णालयात सिविल सर्जन आहेत. ह्याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी केली आहे.

पुढे त्यांनी म्हंटले की, “संतोष देशमुख यांचे शवविच्छेदन झाले, वाल्मीक कराड यांना दोनदा रुग्णालयात आणण्यात आले,  ११ रुग्णांना बाहेर काढून एका ठणठणीत गुन्हेगाराला ICU मधे ठेवण्यात आले, हे पूर्वी आरोग्य मंत्री विमल मुंदडा यांचे OSD होते. मग बीडहून नाशिकला बदली केली आणि आत्ता मोठ्या आशिर्वादाने पुन्हा बीडमध्ये आगमन झाले आहे,” असा दावा दमानियांनी ट्वीटद्वारे केला आहे.

दरम्यान, अंजली दमानिया यांच्या आरोपांनंतर आता बीड रुग्णालयातील डॉक्टर कनेक्शन समोर आले आहे. थोरात यांच्यावर दमानियांकडून करण्यात आलेल्या या आरोपानंतर तपास यंत्रणा याची दखल घेणार का? पुढे यावर कोणते मोठे खुलासे होणार हे देखील स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button