अनुराग कश्यपचा ‘बॅड गर्ल’ वादात, ‘ब्राह्मण घरातल्या मुलींना…’
चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपचा आगामी चित्रपट ‘बॅड गर्ल’चा टीझर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पडद्यावर प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. रविवारी 26 जानेवारी रोजी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. टीझर पाहिल्यानंतर तमिळ इंडस्ट्रीचे दिग्दर्शक मोहन जी चित्रपट निर्मात्यांवर संतापले. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे आपला संताप व्यक्त केला आहे. वास्तविक, वाद हा चित्रपटाच्या टीझरमध्ये दाखवलेल्या ब्राह्मण मुलीचा आहे.
तसेच बॅड गर्ल सिनेमाचे दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि वेत्रीमारन यांना अनेक प्रश्न विचारले आहेत. ब्राह्मण आई-वडिलांना शिव्या देणे जुने आहे. पण फॅशनेबल नाही. तुम्ही तुमच्या जातीच्या मुलींसोबत अशा कथेत हे करून पहा आणि ते आधी तुमच्या कुटुंबाला दाखवा, असा खोचक सवाल मोहन जी यांनी विचारला आहे.
Portraying a brahmin girl personal life is always a bold and refreshing film for this clan. What more can be expected from vetrimaran, Anurag kasyap & Co.. Bashing Brahmin father and mother is old and not trendy.. Try with your own caste girls and showcase it to your own family… https://t.co/XP8mtnaFws
— Mohan G Kshatriyan (@mohandreamer) January 27, 2025
या सिनेमाची कथा एका ब्राम्हण मुलीच्या जीवनावर आधारित आहे. जी समाजातील परंपरा आणि स्वतःच्या इच्छांमध्ये संघर्ष करत आहे. ती एका मुलाच्या शोधात आहे. तिला एक मुलगा भेटतो. त्यानंतर या दोघांमध्ये नाते तयार होते. पण यासाठी तिला तिच्या कुटुंबाकडून टीकेला सामोरे जावे लागते. अशा प्रकारची सर्वसाधारण कथा या सिनेमाची असल्याचे समजते. या सिनेमाच्या कथेबाबत निर्माते मोहन जी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित आक्षेप नोंदविला आहे.
या पोस्टमध्ये त्यांनी एक ब्राह्मण मुलीचे वैयक्तिक जीवन पडद्यावर दाखवणे हे या शैलीतील चित्रपटासाठी एक आव्हानात्मक आणि नवीन ऑफर आहे. वेत्रीमारन, अनुराग कश्यप आणि कंपनीकडून आणखी काय अपेक्षा करता येईल? ब्राह्मण आई-वडिलांना शिव्या देणे जुने आहे. पण फॅशनेबल नाही. तुम्ही तुमच्या जातीच्या मुलींसोबत अशा कथेत हे करून पहा आणि ते आधी तुमच्या कुटुंबाला दाखवा, असा खोचक टोला मोहन जी यांनी लगावला आहे.
बॅड गर्ल सिनेमा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव रॅाटरडॅमच्या ५४ व्या आवृत्तीत प्रदर्शित करण्यात येणार आहे. या सिनेमात अंजली शिवरामन ही मुख्य भूमिकेत आहे. तर शांतीप्रिया, हृदू हारून, सरन्या रविचंद्रन, तीजे अरुणासलम आणि शशांक बोम्मिरेड्डीपल्ली हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन वर्षा भारत यांनी केले असून, वेत्रीमारन यांनी अनुराग कश्यपसोबत या सिनेमाची निर्मिती केली आहे.