आदित्य ठाकरेंनी केली अरविंद केजरीवालाच्या विविध विकासकामाची स्तुती
दिल्ली विधानसभा निवडणुकीची काँग्रेस, भाजप आणि आप यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. मतदानाची या तारीख जवळ येत आहे तसतसे राजकीय हालचाली अधिक तीव्र होत आहेत. समाजवादी पक्ष (सपा) आणि तृणमूल काँग्रेसने अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाला (आप) पाठिंबा जाहीर केला. त्यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल आणि आप सरकारबाबत मोठे विधान केले आहे.
दिल्लीच्या निवडणुकीविषयी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले,”अरविंद केजरीवालांवर आरोप करण्याचे अनेक प्रयत्न झाले आहेत, परंतु गेल्या १० वर्षात त्यांनी सरकार कसे चालवायचे ते दाखवून दिले आहे. केजरीवाल यांनी पाणी, वीज, शाळा, रुग्णालये या क्षेत्रात चांगले काम केले आहे. दिल्ली हे एक महत्वाचे राज्य आहे. पण जनता ज्याने काम केले आहे त्याला विजयी करेल. ही आमची आशा आहे, हा माझा विश्वास आहे.”असेही त्यांनी यावेळी सांगितले.
त्याचवेळी आदित्य ठाकरे यांनी परीक्षा केंद्रांवर बुरखा बंदी घालण्याच्या मंत्री नितेश राणे यांच्या मागणीवर निशाणा साधला. ते म्हणाले, “या देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षा देण्याचा अधिकार आहे. मला (नितेश राणे) हे विधान करणाऱ्या घाणेरड्या माणसाच्या तोंडाला मला लागायचे नाही असे त्यांनी म्हटले.” सिद्धिविनायक ड्रेस कोड वादावर बोलताना ते म्हणाले की, “आधी मंदिर प्रशासनाने ड्रेस कोड काय असावा हे सांगावे? जर मंदिर किंवा इतर कोणत्याही धार्मिक स्थळासाठी योग्य ड्रेस कोड असेल तर ते ठीक आहे. जगात कुठेही जा, धार्मिक स्थळांसाठी एक ड्रेस कोड असतो.” असेही त्यांनी म्हटले आहे.
आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. याविषयी त्यांनी, “मुंबईचा एक्यूआय दिवसेंदिवस खराब होत चालला आहे. सरकारकडून कोणतीही कारवाई केली जात नाही, कोणतेही उत्तर येत नाही, कोणीही आमचे ऐकत नाही. हे समोर येत आहे. पर्यावरण विभाग काय करत आहे हे कोणालाही माहिती नाही. मुख्यमंत्र्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. मुंबईचा एक्यूआय का खालावत आहे हे विचारायला कोणीही तयार नाही.” असे त्यांनी म्हटले. तसेच पुढे बोलताना त्यांनी,”राज्य सरकारला मुंबईची अजिबात चिंता नाही. मुंबईतील रस्ते खूपच वाईट आहेत. जर आमचे सरकार सत्तेत असते तर आम्ही रस्त्याच्या कंत्राटदारावर कारवाई केली असती आणि त्याला अटक केली असती.” असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.