महाराष्ट्रराजकारण

उद्धव ठाकरेपाठोपाठ अजित पवारांच्या बॅगची तपासणी, कर्मचाऱ्यांना म्हणाले, तुम्ही ही खा…

बारामती : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बँगांची सोमवारी आणि मंगळवारी तपासणी झाल्याचा मुद्दा ताजा असतानाच आता उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरचीही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली आहे. यासंदर्भातील माहिती स्वत: अजित पवार यांनी दिली आहे. अजित पवारांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधील बॅगेत सापडलेल्या गोष्टी तुम्ही ही खा, असे ते कर्मचाऱ्यांना म्हणाले.

विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर नेतेमंडळींच्या प्रचारसभांनी जोर धरला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बॅगांची सलग दोन दिवस तपासणी करण्यात आली. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देखील बारामती येथे हेलिकॉप्टर आणि बॅगची तपासणी करण्यात आली आहे.

बारामतीत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या हेलिकॉप्टरची तापासणी केली. अजित पवारांच्या सर्व बॅगा तपासण्यात आल्या. हा व्हिडीओ शेअर करत अजित पवार यांनी म्हंटले की, “मी आज निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असताना निवडणूक आयोगाने माझ्या हेलिकॉप्टरची आणि हेलिकॉप्टरमधील बँगांची तपासणी केली. मी यावेळी त्यांनी पूर्ण सहकार्य केलं. मुक्त आणि पारदर्शक निवडणुकीसाठी अशाप्रकारच्या अत्यावश्यक गोष्टी गरजेच्या असल्याचं माझं मत आहे. आपण सर्वांनी कायद्याचा आदर केला पाहिजे. या माध्यमातून आपण आपल्या लोकशाहीच्या मूल्यांची जोपासणा केली पाहिजे,” असं म्हटलं आहे.

दरम्यान, लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची विमानतळावर बॅगेची तपासणी करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी वणी येथेही असाच प्रकार झाला होता. यावर उद्धव ठाकरे यांनी स्वतः व्हिडिओ करत कर्मचाऱ्यांची उलट तपासणी केली. त्यानंतर लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होती. या सभेतही बॅग तपासणीवर त्यांनी जोरदार टीका केली. ‘माझ्या बॅग तपासा…पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची बॅग का तपासत नाहीत?’ असा सवालही त्यांनी केला.

तर दुसरीकडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बँगांचीही 5 नोव्हेंबर रोजी तपासणी झाल्याचे व्हिडीओ भाजपाने पोस्ट केले असतानाच आता अजित पवारांच्या बँगांचीही तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील प्रमुख नेते राज्यातील विविध जिल्ह्यात जाऊन जाहीर सभा घेत आहेत. यादरम्यान, राजकीय नेत्यांसोबत असणाऱ्या बॅगेची तपासणी देखील केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button