महाराष्ट्रराजकारण

आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांना जीवे मारण्याची धमकी

अमरावती : दक्षिण भारतातील प्रसिद्ध अभिनेते आणि आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री ‘पवन कल्याण’ यांना देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. जिथे दादागिरी करत शिवीगाळ करत उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. धमकी पाठवणाऱ्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. त्यामुळे या घटनेमागे नेमका कुणाचा हात आहे अद्याप समोर आलेलं नाही.

पवन कल्याण यांच्या जनसेवा पार्टीच्या ट्विटर हँडलवरूनही एक पोस्ट करण्यात आली. ‘मोबाईलवर धमकीचा कॉल आला. उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना एका अनोळखी क्रमांकावरून धमकीचा फोन आला की त्यांना मारून टाकलं जाईल. यानंतर शिवीगाळ करणारे अनेक मेसेजही आले. असं यामध्ये सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पवन कल्याण कॅनडातील एका हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ल्याबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यावेळी ते चर्चेत आले होते. ते म्हणाले होते की, हा हल्ला इतर घटनांपेक्षा मोठा आहे. या घटनेमुळे मला खूप दु:ख झाले आहे आणि कॅनडाचे सरकार तेथील हिंदू समुदायाच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आवश्यक पावले उचलेल, अशी आशा आहे.

कल्याणने काही काळापूर्वी हे विधेयक मांडले होते
कल्याणने गेल्या महिन्यात राज्य विधानसभेत सोशल मीडिया गैरवर्तन संरक्षण विधेयक सादर करण्याचा प्रस्ताव ठेवला होता आणि ऑनलाइन छळाच्या मुद्द्यांवर कारवाई करण्याची सरकारला विनंती केली होती. विधानसभेत बोलताना त्यांनी सार्वजनिक व्यक्तींना, विशेषत: महिलांना लक्ष्य करून होणाऱ्या ऑनलाइन छळावर चिंता व्यक्त केली.

ते म्हणाले होते की डिजिटल प्लॅटफॉर्मचा गैरवापर धोकादायक पातळीवर पोहोचला आहे, राजकीय नेते लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि धमकावण्यासाठी त्याचा वापर करत आहेत. सायबर गुंडगिरीची ही प्रवृत्ती लोकशाही प्रक्रियेसाठी हानिकारक आहे आणि आंध्र प्रदेशने आपल्या नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आदर्श ठेवला पाहिजे, असा युक्तिवाद कल्याण यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button