तुमच्या कपाळाला बेईमानीची पट्टी, उदय सामंतावर संजय राऊत कडाडले
मुंबईः शिवसेनेचे मंत्री उदय सामंत हे दोवास दौऱ्यावर असून त्यांनी शिवसेना ठाकरे पक्षाचे 4 आमदार आणि 3 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटले आहेत. तसेच काँग्रेसचे 5 आमदारही एकनाथ शिंदेंना भेटून गेल्याचा दावा सामंतांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याचा ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी समाचार घेत त्यांना खडबोल सुनावले. उदय सामंत हे भटकती आणि लटकती आत्मा असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ‘उदय सामंत हे दावोसमध्ये बसून एकनाथ शिंदे यांना कोण भेटतंय ते सांगतायत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदय सामंत यांना दावोसमधून परत महाराष्ट्रात पाठवून द्यावं’, असं खोचकपणे संजय राऊत यांनी म्हटलंय.
उद्योगमंत्री उदय सामंत गुंतवणूक आणण्यापेक्षा शिवसेनेते किती आमदार, खासदार फुटतील हे दावोसमधून सांगत आहेत. दावोसमध्ये बसून एकनाथ शिंदेंना कोण भेटलं, तीन खासदार भेटले, 10 आमदार भेटले हे गुंतवणूक करत आहेत का? त्यांना मुख्यमंत्र्यांनी त्यांना मुंबईला परत पाठवले पाहिजे असे राऊत म्हणाले. शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी दावा केला होता की, राज्यातील विरोधी काँग्रेस आणि शिवसेनेमधील 10 ते 15 आमदार आमच्या संपर्कात आहेत. 23 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षात सामील होतील.