हिरवळीमुळे सांगोला पोलीस स्टेशनचा बदलता ‘लूक’
पो.नि. भीमराय खणदाळे यांचे निसर्गप्रेमी व्यक्तिमत्त्व

सांगोला (प्रतिनिधी);-
झाडांची हिरवळ माणसांच्या डोळ्याला व मनाला सुखद अनुभूती देत असते. पावसाळ्यात जसे निसर्ग लक्ष वेधते तसेचं ऐन उन्हाळ्यात त्याचा सहवास आणि लोभ आणखीनच हवाहवासा वाटतो.
पोलीस स्टेशन म्हंटले की, सर्वानाच ‘टेन्शन’ वाटतं, परंतु याचं परिसरात असणारे निसर्गाचे सौंदर्य टेन्शन दुरही करू शकते. सांगोला पोलीस स्टेशनची असणारी भव्य इमारत आणि त्यांच्या आसपास असणारी विविध प्रकारची झाडे यामुळे अनेकांना निवारा तर अनेकांना दिलासा मिळतो.
यापूर्वी तहसील कार्यालया नजीक असणाऱ्या पूर्वीचे पोलीस स्टेशन हे सांगोला- पंढरपूर रोडवर बांधण्यात आलेल्या नवीन इमारतीत स्थालांतर झाले. परंतु या इमारतीच्या वैभवात भर टाकण्यासाठी वृक्ष लागवड गरजेची होती. या उद्देशाने सन २०१७ मध्ये तत्कालीन पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी पर्यावरण प्रेम जपत मोठ्या संख्येनी वृक्षलागवड केली. ज्यामुळे आज झाडे आणि मनमोहक परिसर दिसत आहे.
प्रत्येक रोपट्याचे संगोपन करणे गरजेचे असल्याने पोलीस हवालदार शिवाजी परांडे (मामा ) यांनी पोलीस स्टेशनमध्ये अंमलदार म्हणून कर्तव्यावर असताना, परिसरातील झाडे स्वतः लक्ष देत पाणी देत असे, त्यांच्या याचं कामामुळे आज पोलीस स्टेशन समोर पश्चिम बाजूला असणारी झाडे जोमाने उभी आहेत.
सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ‘एव्हरग्रीन’ व्यक्तीमत्व असणारे पोलीस निरीक्षक भीमराय खणदाळे यांनी, सद्या सांगोला पोलीस स्टेशनच्या पाठीमाघील पूर्व बाजूस काळी माती आणून त्यावर हिरवळीचा (लॉन) एक ब्लॉक तयार केला आहे. विटांचे केलेले आकर्षक किनार आणि शुभ्र रंग आणखीच लक्षवेधी दिसत आहे. सोबतच फुलांची विविध झाडेही लावल्याने पोलीस स्टेशनचा ‘लूक’ बदलत असल्याचे दिसत आहे.
त्याचबरोबर संपूर्ण जागेला असणाऱ्या तरेच्या संरक्षक कुंपणा लगत झाडे लावण्यात आली आहेत, यामुळे संपूर्ण परिसर अत्यंत मनमोहन दिसणार आहे. सांगोला शहरातील शासकीय इमारतीमध्ये आकर्षक व निसर्गच वैभवयुक्त परिसरात अव्वल दिसणार आहे.
यामध्ये स.पो.फौ. बाबासाहेब भातुकडे , पो.हे.कॉ.संतोष देवकर , दीपक घोंगडे, पो.कॉ. गणेश कुलकर्णी यांच्या देखरेखीखाली ‘लख’न मात्र अत्यंत व्यस्त दिसून येत आहे आणि त्याची तारेवरची कसरत नेहमीच आठवणींची तर राहीलचं, त्याचबरोबर तत्कालीन पो. नि. राजकुमार केंद्रे व सद्याचे पो. नि. भीमराय खणदाळे यांची अनोखी कारकीर्द फुलांप्रमाणे प्रेरणादायी, वर्षानुवर्षे अनेकांना सावली देत राहील.