‘छावा’ चित्रपटात वादाच्या भोवऱ्यात, या सिनला इतिहासप्रेमींचा विरोध
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित आणि अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना स्टारर ‘छावा’ चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी प्रदर्शित झाला. दरम्यान, या चित्रपटातील एका सीनवर संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
विकी कौशल याच्या लेझिम नृत्यावर नाराजी व्यक्त करत संभाजी राजे म्हणाले, ‘छावा चित्रपटात संभाजीराजे हे लेझिमवर नृत्य करताना दिसले आहेत. लेझिम खेळताना दाखविणं चुकीचं नाही, पण ते लेझिमवर नृत्य करताना दाखविले आहेत. सिनेमॅटिक लिबर्टी किती घ्यावी याला देखील काही मर्यादा असल्याचे त्यांनी म्हटले. तर छत्रपती संभाजी महाराज याच्या जीवनावर चित्रपट तयार करणारे दिग्दर्शक उत्तेकर एक मराठी माणूस आहे त्यांनी खूप मोठं धाडस करून संभाजी महाराजांवर चित्रपट बनवला आहे. त्यामुळे यामध्ये कुठलेही चुका राहू नयेत अशीच आमची ही इच्छा असल्याचे संभाजीराजे म्हणाले.
तर ‘चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी माझी भेट घेतली होती, त्यावेळेला सर्व चित्रपट झाल्यानंतर तो चित्रपट इतिहास अभ्यासकांसोबत दाखवा अशी मी विनंती केली होती. आताही त्यांनी आम्हाला आणि इतिहास संशोधकांना तो चित्रपट दाखवावा, असे म्हणत पुन्हा एकदा विनंती केली आहे.
मराठा क्रांती मोर्चातर्फे आज पुण्यात आंदोलनाचा इशारा
‘छावा’ या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज व येसूबाई यांचे नाचतानाचे दोन प्रसंग हे आक्षेपार्ह असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. त्यामुळे आज सकाळी १० वाजल्यापासून पुण्यात लाल महाल येथे मराठा क्रांती मोर्चाकडून चित्रपटाचा निषेध करण्यात येत आहे. तसेच चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्वरित हे दोन्ही प्रसंग चित्रपटातून वगळावे, अन्यथा मराठा समाज आणि शिवप्रेमी हा चित्रपट महाराष्ट्रात कुठेही प्रदर्शित होऊ देणार नाही’, असा इशाराही दिला आहे.