देश-विदेश

असा विजय आपल्या देशाने कधीच पाहिला नाही, राष्ट्राध्यक्षपदाच्या विजयानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया

न्यूयॉर्क : अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांचा पराभव झाला. 2020 सालच्या पराभवानंतर चार वर्षांनी ट्रम्प पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले आहेत

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना बहुमत मिळाले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना 279 इलेक्टोरल मते मिळाली आहेत, तर कमला हॅरिस यांना 223 इलेक्टोरल मते मिळाली आहेत.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील विजयानंतर डोनाल्ड ट्रम्प पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्यासह त्यांच्या समर्थकांमध्ये पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी सर्व मतदारांचे आभार मानले आहेत. तसेच यावेळी बोलताना ट्रम्प यांनी,

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प पत्नी मेलेनियासोबत समर्थकांमध्ये पोहोचले आहेत. इथे डोनाल्ड ट्रम्प यांचं भाषण सुरु आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व मतदारांचे आभार मानले आहेत. हा इतिहासातील महान राजकीय क्षण असल्याच ट्रम्प यांनी म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प मतदारांना संबोधित करताना म्हणाले की, “आम्ही मतदारांसाठी सर्व काही ठीक करणार आहोत. हा एक राजकीय विजय आहे. असा विजय आपल्या देशाने कधी पाहिलेला नाही. 47 वा राष्ट्रपती म्हणून प्रत्येक दिवस तुमच्यासाठी लढेन. हा अमेरिकेचा शानदार विजय आहे. अमेरिका पुन्हा एकदा महान राष्ट्र बनेल” असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर अमेरिकेचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार जेडी वेंस यांनी सुद्धा रिपब्लिकन पार्टीच्या मतदारांना संबोधित केलं. “मी शुभेच्छा देतो. अमेरिकेच्या इतिहासात महान राजकीय पुनरागमन झालं आहे. अमेरिकेच्या इतिहासातील हे सर्वात मोठं आर्थिक पुनरागमन आहे” जेडी वेंस यांनी आपल्या क्षेत्रात विजय मिळवला आहे.

“लोकांनी अमेरिकेत परत आलं पाहिजे पण कायदेशीररित्या. इथे उपस्थित असलेला प्रत्येकजण खास आणि महान आहे” असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी एलॉन मस्कच कौतुक केलं. “मस्क कमालीचा माणूस आहे. एलॉन मस्कने जे करुन दाखवलं, ते रशिया करु शकतो का?. चीन करु शकतो का?. कोणी अन्य असं करु शकत नाही” त्यांनी स्पेस एक्सच्या लॉन्चच सुद्धा कौतुक केलं. अमेरिकन बॉर्डर सुरक्षित करण्याचा मुद्दा ट्रम्प यांनी पुन्हा मांडला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button