दोन मोठया चित्रपट अभिनेत्यांना एकत्र पाहणे चाहत्यासाठी पर्वणी असते. बॉलीवूडचे तीन खान हे एकत्र यावे, अशी प्रत्येक चाहत्यांची इच्छा आहे. हे तीन खान एकत्र येऊ या नाही येऊ, मात्र बॉलीवूड अन् टॉलीवूडचे दोन महान अभिनेता एका फ्रेममध्ये दिसणार आहे. हे दोन मोठे स्टार्स आहे शाहरुख खान आणि अल्लू अर्जून. शाहरुखने 2023 मध्ये तीन ब्लॉकबस्टर हिट चित्रपट दिले. तर अल्लू अर्जुनने त्याच्या पुष्पा २ चित्रपटाने जवळपास जुन्या सर्वच चित्रपटांचे रेकार्ड मोडीत काढले. आता हे दोन्ही स्टार्स एका खास प्रोजेक्टसाठी एकत्र येणार आहेत. तुम्हाला वाटत असेल त्यांचा कोणता नवीन चित्रपट असेल तर तसे नसून एका जाहिरातीच्या प्रोजेक्टसाठी हे दोन स्टार्स एकत्र येणार आहेत.
बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, अल्लू अर्जुन आणि शाहरुख खान एका थंड पीये ब्रँडच्या प्रमोशनसाठी एकत्र येणार आहेत. कंपनीने या दोन अभिनेत्यांसह आपली नवीन जाहिरात शूट करण्याची ठरवले आहे. अल्लू अर्जुन आणि शाहरुख खान दोघेही थम्स अप अपच्या जाहिरातीत दिसणार आहेत. कंपनीला या स्टारच्या द्वारे लोकांचे लक्ष त्यांच्या ब्रँडकडे आकर्षित करायचे आहे.
हिंदी चित्रपट इंडस्ट्रीमधील किंग खान नावाने ओळख असलेला शाहरुखचा मोठा चाहतावर्ग आहे. तसेच अल्लू अर्जुनबद्दल बोलायचे झाले तर साऊथमध्ये त्याची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. याशिवाय, हिंदी डब केलेल्या प्रेक्षकांमध्ये अल्लूचा चाहतावर्ग मोठा आहे. पुष्पा 2 नंतर हिंदी चित्रपट इंडस्ट्रीमध्ये त्याचा चाहता वर्ग आणखी मोठा झाला आहे.
शाहरुखने २०२२ मध्ये केली होती जाहिरात
या सॉफ्ट ड्रिंकची जाहिरात शूट करण्यात आली आहे की शूट करायची आहे हे अद्याप कळू शकलेले नाही. ही जाहिरात फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात रिलीज करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. शाहरुख खानची थम्स अप जाहिरात तीन वर्षांपूर्वी म्हणजेच 2022 मध्ये आली होती. ही जाहिरात खूप व्हायरल झाली होती. कारण या जाहिरातीत शाहरुख खान ‘पठाण’ लूकमध्ये होता.
शाहरुख ‘किंग’मध्ये व्यस्त, तर अल्लू पुष्पा ३ च्या तयारीत
शाहरुख आपल्या किंग सिनेमाच्या कामामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याची मुलगी सुहाना खानची देखील भूमिका असणार आहे. सुजॅाय घोष सुरूवातीला या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार होते. मात्र, आता किंगचे दिग्दर्शन पठाण चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद हे करणार आहेत. दुसरीकडे, अल्लू अर्जुनबद्दल बोलायचे झाले तर त्याच्या पुष्पा ३ साठी उत्सुकात निर्माण झाली आहे.