स्टाईल फेम अभिनेत्याचे 26 वर्षांनी लहान गर्लफ्रेंडसोबत दुसरे लग्न, तिचा धर्मही बदलला
अभिनेता, फिटनेस एंटरप्रन्योर आणि युट्यूबर साहिल खान सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. वर्षभरापूर्वी दुसरं लग्न केलं होतं. त्याच्यापेक्षा वयाने २६ वर्षांनी लहान असलेल्या मुलीसोबत साहिलने लग्न केलं आहे. त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव मिलेना अलेक्जांड्रा असं आहे. काही तासांपूर्वीच अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्याच्या पत्नीने इस्लाम धर्माचा स्वीकार केल्याचे सांगितले आहे. अभिनेत्याची ही इन्स्टाग्राम पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत असून नेटकरी त्याच्यावर प्रचंड संतापले आहेत.
View this post on Instagram
साहिल खानने २०२४ मध्ये मिलेनाशी युरोपमध्ये लग्न केले. साहिलची दुसरी पत्नी मिलेना ही युरोपमधील बेलारूसची आहे. लग्न केल्याच्या काही महिन्यानंतर मिलेनाने धर्मपरिवर्तन केलं असल्याचं समोर आलं आहे. यामुळे ४८ वर्षीय साहिलला नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं आहे. ‘हे करणं गरजेचं होतं का?’ असा सवाल नेटकऱ्यांनी साहिलला विचारला आहे. काही युजर्सचे म्हणणे आहे की, साहिल खानने त्याच्या पत्नीवर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकलाय. त्यामुळे साहिल खान नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे.
पत्नीसोबतचा फोटो पोस्ट करत साहिलने पत्नीच्या धर्मपरिवर्तनाबद्दल चाहत्यांना सांगितले की, “मला हे सांगताना अत्यंत गर्व वाटतोय की, माझी पत्नी मिलेना ॲलेक्झांड्राने इस्लाम धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. अल्लाहचं नाव घेत आम्ही सुंदर प्रवासाला सुरुवात करत आहोत. अल्लाह आम्हाला माफ करा आणि आमची प्रार्थना स्वीकारा.”, असं त्याने पोस्टमध्ये लिहिलंय. यावरून अनेकांनी साहिलवर टीका केली आहे. दरम्यान, साहिलची पत्नी केवळ २२ वर्षांचीच आहे. जेव्हा त्यांनी लग्न केलं त्यावेळी ती फक्त २१ वर्षांचीच होती. साहिल आणि मिलेनामध्ये तब्बल २६ वर्षांचं अंतर आहे. याआधीने साहिलने २००३मध्ये निगार खानबरोबर लग्न केलं होतं. पण त्यांचं नातं जास्त काळ टिकू शकलं नाही. साहिल आणि निगारने २००५ साली घटस्फोट घेतला.
साहिल खानच्या पत्नीच्या धर्मपरिवर्तनाच्या पोस्टवर नेटकरी कमेंट करत म्हणतात की “जर तुमचं दोघांचंही खरोखर एकमेकांवर प्रेम आहे तर तिने धर्म बदलण्याची गरजच काय?”, “तुझं तिच्यावर खरं प्रेम असेल तर तूच ख्रिश्चन धर्म स्वीकारायला काय हरकत होती?”, “काहीही अध्ययन आणि शोध न घेता इस्लाम स्वीकारण्याचा काय फायदा? केवळ इस्लामच नाही तर फक्त लग्न करण्यासाठी धर्म स्वीकारण्याचा काय फायदा जर तुमच्या दोघांचं नातं घट्ट आहे.”, “लग्नानंतर धर्म परिवर्तन करणं गरजेचं आहे का?”