वाल्मिक कराडच्या पहिलीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे चौपट संपत्ती
लातूर टेंभुर्णी महामार्गावर मुरूडच्या जवळ वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव हिच्या नावे कोट्यवधींची जमीन असल्याची माहिती समोर आली आहे.
कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या म्हणजेच ज्योती मंगल जाधव यांच्या नावे तब्बल साडे सतरा कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. पुणे, सोलापूर, बीड जिल्ह्यात ही कोट्यावधी रुपयांची मालमत्ता असल्याचे उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तसेच लातूरमध्येही कराडच्या या दुसऱ्या पत्नीच्या नावाने आलिशान बंगला आणि कोट्यावधींची प्रॅापर्टी असल्याचे समोर आले आहे. लातूर शहरातील महापालिकेच्या हद्दीतील न्यू सरस्वती कॅालनी भागात आलिशान बंगला असल्याचे समोर आले आहे. मात्र, या आलिशान बंगल्याचे काम थांबवण्यात आले आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी राज्यात संतापाची लाट आहे. या हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मीक कराडवर आरोप केले जात आहेत. या प्रकरणामुळे लातूर शहरातील कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे असणाऱ्या आलिशान बंगल्याचे काम तातडीने थांबवण्यात आले आहे. आमदार सुरेश धस हे या प्रकरणावर चांगलेच आक्रमक झाले आहेत. धस यांनी केलेल्या आरोपानंतर कराडच्या पत्नीच्या नावावर असलेल्या प्रार्टीजची माहिती उघड झाली.
वाल्मिक कराडची पहिली पत्नी मंजीरीच्या नावे सव्वाचार कोटी रुपयांची मालमत्ता आहे. तर दुसरी पत्नी ज्योतीच्या नावे साडेसतरा कोटी रुपयांची मालमत्ता आढळून आली आहे. अशाप्रकारे दोन्ही पत्नींच्या नावे मिळून एकूण 19 कोटी 75 लाख रुपयांची मालमत्ता आतापर्यंत आढळून आली आहे.
पहिली पत्नी मंजिलीच्या नावे असलेली संपत्ती
– पहिली पत्नी मंजीली आणि वाल्मिकच्या स्वतःच्या नावे पिंपरी – चिंचवडच्या काळेवाडीत 4 BHK फ्लॅट – अंदाजे किंमत – सव्वा तीन कोटी.
– पहिली पत्नी मंजीली आणि वाल्मिकच्या स्वतःच्या नावे पिंपरी – चिंचवडच्या वाकडमधे टू बीएचके फ्लॅट – अंदाजे किंमत एक कोटी.
वाल्मिकची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव हिच्या नावे असलेली संपत्ती
– फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर असलेल्या इमारतीत दोन ऑफिस स्पेसेस – अंदाजे किंमत – अंदाजे बारा कोटी.
– पुण्यातील हडपसरमधील अॅमनोरा टाऊनशीपमधे एक फ्लॅट – किंमत अंदाजे दीड कोटी रुपये.
– खराडी मधील गेरा ग्रीन्सव्हीला सोसायटीत एक फ्लॅट – किंमत अंदाजे – पावशे दोन कोटी रुपये.
– सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेंद्रे गावात 35 एकर जमीन. किंमत अंदाजे दीड कोटी रुपये.
– दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावे बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा इथे 9 एकर जमीन. किंमत अंदाजे सत्त्यात्तर लाख रुपये.