इतरदेश-विदेशभारत

शिक्षिकेचा वर्गातच आराम, विद्यार्थी देताय पुठ्ठ्याने हवा

उत्तर प्रदेशातील शिक्षणांच्या दुरावस्थेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अलीगढ जिल्ह्यातील धानीपूर ब्लॉक अंतर्गत गोकुळ गावात असलेल्या प्राथमिक शाळेतील हा व्हिडिओ असल्याचं सांगण्यात येत आहे.

यात शिक्षिका विद्यार्थ्यांना शिकवताना नाही, तर शाळेच्या वेळेत झोपलेली दिसत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये शिक्षिका शाळेच्या वेळेत वर्गात चटई पसरुन झोपलेली दिसत आहे. इतकंच नाही तर, या शिक्षिकेने विद्यार्थ्यांना पुठ्ठ्याने हवा घालायला लावली. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सध्या समोर आला आहे.

उत्तर प्रदेशातील प्राथमिक शाळांमधील सरकारी शिक्षक मुलांना कसं शिकवतात आणि त्यांचं भविष्य घडवत आहेत, याचं उदाहरण या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. अलीगडमधील एका प्राथमिक शाळेतील हा व्हिडीओ असल्याचं सांगण्यात येत आहे. या व्हिडीओमध्ये शासकीय शिक्षक शाळेच्या वेळेत वर्गात झोपून राहिल्याचं दिसत आहे आणि वीज नसताना चिमुकल्या विद्यार्थ्यांना पुठ्ठ्याने हवा घालायला लावली.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, महिला शिक्षिका शाळेतील वर्गात चटईवर झोपली आहे आणि शाळेच्या गणवेशात असलेले चिमुकले विद्यार्थी शिक्षिकेला हातपंख्याने हवा घालत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अलीगढ जिल्ह्यातील धानीपूर ब्लॉकमधील असल्याचं समोर आलं आहे.

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याच शिक्षिकेचा आणखी एक जुना व्हिडीओही चर्चेत आला आहे. जुन्या व्हिडीओमध्ये शिक्षक एका मुलाला काठीने मारहाण करताना दिसत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हा व्हिडीओ एक वर्ष जुना आहे. तपास विभागाचे शिक्षणाधिकारी राम शंकर कुरील यांनी दोन्ही व्हिडीओ एकाच शिक्षिकेचा असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हे दोन्ही व्हिडीओ मुख्याध्यापिका डिंपल बन्सल यांचे असल्याचं समोर आलं आहे. तिला निलंबित करण्यात आलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button