बंडखोरी करणाऱ्यास काढले पक्षाच्या बाहेर, उध्दव ठाकरे यांची करवाई
मुंबई : बंडखोरी करून पक्षाविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या बंडखोरांना पक्षातफे कडक कारवाईला सामोरे जावे लागत आहे. बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावे, असे आवाहन सर्वच पक्षाच्या नेत्यांनी केले होते. त्याला प्रतिसाद न देणाऱ्या बंडखोरांवर आता पक्ष कारवाईचा बडगा उगरला आहे. विधानसभा िनवडणुकीत अर्ज मागे घेण्याची तारीख उलटून गेली आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत बंडखोरी करणाऱ्या नेत्यांविरोधात कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी सकाळी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास ठाकरेंनी नेत्यांना सांगितले होते. पण अनेकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे ठाकरेंनी कठोर कारवाई करत पाच जणांना पक्षातून निलंबित केलेय.
तिकीट नाकारल्यामुळे आपल्याच पक्षाच्या विरोधात उतरलेल्या बंडखोरांवर ठाकरेंनी मोठी कारवाई केली आहे. अखेरच्या दिवशीही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे ठाकरेंनी कारवाई केली. भिवंडी पूर्वचे रुपेश म्हात्रे, विश्वास नांदेकर, चंद्रकांत घुगुल, संजय अवारी आणि प्रसाद ठाकरे यांच्यावर निलंबनाची करवाई करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बंडखोरीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. १४ मतदारसंघात बंडखोर नेते विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत. काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्या पक्षातील नेते मैदानात उतरलेत. ठाकरेंनी बंडखोरी मागे घेण्यास आपल्या नेत्यांना सांगितले. पण बंडोबा आपल्या निर्णायावर कायम राहिले, त्यामुळे ठाकरेंनी निलंबनाची कारवाई केली. उद्धव ठाकरेंनी पाच जणांना निलंबित केले.
कसबा पेठमधील मुखतार शेख यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असून मविआचे अधिकृत उमेदवार रवींद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा दिलाय. काँग्रेसने सात नाराजांचे बंड शमवले आहेत. त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. नाशिक मध्य हेमलता पाटील, भायखळा मधु चव्हाण, नंदूरबर विश्वनाथ वाळवी यांनी उमेदवारी मागे घेतली.