हर्षवर्धन पाटलांच्या भावाचा विरोधकाला पाठिंबा
इंदापूर : विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. विरोध, पाठिंबा या गणितावर प्रत्येक उमेदवार आपल्या विजयाचा हिशोब लावत आहे. आपल्याला जास्तीत जास्त पाठिंबा मिळावा म्हणून ते प्रयत्न करताना दिसतात. मात्र इंदापुरचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. हर्षवर्धन पाटील यांचे चुलत भाऊ मयूर पाटील यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यामुळे इंदापुरमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूर पाटील यांनी प्रवीण मानेंना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. इंदापुरमध्ये मयूर पाटील यांचे चांगले राजकीय वर्चस्व आहे. यावेळी मयूर पाटील यांच्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सचिन देवकर यांनी देखील प्रवीण मानेच्या परिवर्तन विकास आघाडीला पाठिंबा दिला. इंदापुरमध्ये हळूहळू प्रवीण मानेंच्या परिवर्तन विकास आघाडीचा जनाधार वाढत आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
दरम्यान, इंदापुरच्या हिंगणगावात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर जेसीबीतून फुलांची उधळण करण्यात आली. घोड्यावरून त्यांची वाजत गाजत मिरवणू काढण्यात आली. पुण्याच्या इंदापुरमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा प्रचार शीगेला पोहोचलाय. माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांची इंदापुरच्या हिंगणगावमध्ये घोड्यावरून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. तर याचवेळी ग्रामस्थांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर जेसीबीतून फुलांची उधळून देखील केलीय. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.