महाराष्ट्र

कर्मचाऱ्यांवरही आता निवडणूक आयोगाची करडी नजर, चक्र अ‌ॅप २४ तास चालू ठेवावे लागणार

परवीन सय्यद नजाकत / बदनापूर जिल्हा जालना
निवणूक आयोगाने विधानरसभा सार्वत्रिक निवडणुका जाहीर केल्यानंतर निवडणूक विभागाने निवडणुकीची पूर्ण तय्यारी केली असून निवडणूक मतदान केंद्रावर साहित्य घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखील आता निवडणूक आयोगाची करडी नजर असून १९ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबरपर्यंत मतदान केंद्र अध्यक्ष व प्रथम अधिकारी यांना चक्र अ‌ॅप २४ तास चालू ठेवावे लागणार असून या अ‌ॅपद्वारे सदर कर्मचारी कुठे आहे याची क्षणा क्षणाची माहिती आयोगाला मिळणार असल्याने निवडणूक मतदान केंद्र अध्यक्ष व प्रथम मतदान अधिकारी यांना गाफील राहता येणार नाही. आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक विभागाने सर्वच बाबींवर बारीक लक्ष ठेवण्यास सुरुवात केली असून समाजमाध्यमावरील प्रचारावरही आयोग लक्ष ठेवून आहे.

विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणार असून त्याचा निकाल दि. २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. विविध पक्षांच्या व अपक्षांच्या प्रचाराची फेऱ्यांचा धुराळा सर्वत्र उडत असताना प्रशासनही निवडणुकांच्या तयारीला लागलेले आहे. निवडणूक विभागाने मतदान केंद्र स्थापनेपासून ते मतदारांना आकर्षित करण्यापर्यंत सर्व तयारी जल्लोषात पूर्ण केलेली आहे. मतदान केंद्राध्यक्ष व मतदान केंद्राधिकार क्रमांक १ ते ३ चे प्रशिक्षण विविध सत्रांद्वारे करण्यात येत आहे. विधानसभाच्या मुख्यालयी निवडणूक ‍निर्णय अधिकारी व निवडणूक सह निर्णय अधिकारी यांच्या प्रमुख उपिस्थतीत या सर्व अधिकाऱ्यांना मतदान प्रक्रियेबाबत बारकाईने प्रशिक्षित करण्यात येत आहे. त्याचबरोबर मतदान यंत्र (बॅलेट युनिट) बाबत संपूर्ण माहिती या प्रशिक्षण सत्रात देण्यात येते. मशिनची निगराणी, सिलिंग, सोबत द्यावयाचे विविध कागदपत्रांची पूर्तत कशी करावी या बाबत तज्ञ प्रशिक्षिकांकडून मतदान अधिकाऱ्यांना प्रशिक्षीत करण्यात येते. तसेच झोनल अधिकारी ही विविध गावात जाऊन आदर्श मतदान केंद्र निर्माण करण्याकडे लक्ष देऊन आहेत. या निवडणुकीत प्रशासनातर्फे चक्र नावाचे अ‌ॅप विकसित करण्यात आलेले असून निवडणुकीदरम्यान मतदान केंद्रावरील केद्र अधिकारी व प्रथम मतदान अधिकाऱ्यांना हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करावे लागणार आहे. या अ‌ॅपद्वारे निवडणूक विभाग त्या केंद्राधिकारी व मतदान अधिकाऱ्यांच्या हालचालीवर थेट लक्ष ठेऊ शकणार आहे. मतदान साहित्य मिळाल्यानंतर हे अ‌ॅप कार्यान्वित होईल. म्हणजे दि. १९ नोव्हेंबर रोजी साहित्य घेताच हे अ‌ॅप चालू होईल. मतदान साहित्य घेतल्यानंतर सदरील अधिकारी हे ठरवून दिलेल्या मार्गाने मार्गक्रमण करत ठरवून दिलेल्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचले की नाही या बाबत या अ‌ॅपद्वारे खात्री करण्यात येऊ शकते. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी म्हणजे दि. २० नोव्हेंबर रोजी ही पूर्ण दिवस हे अ‌ॅप मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी मतदान केंद्रावरच असल्याची खात्री होणार आहे. मतदान संपल्यानंतर सर्व साहित्य सिलबंद करून ते ठरवून दिलेल्या मार्गानेच पुन्हा साहित्य वाटप ठिकाणापर्यंत पोहोच करण्यापर्यंत हे अ‌ॅप सुरूच ठेवावे लागणार असल्यामुळे केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना साहित्य वाटप ते मतदान केंद्र व मतदान केंद्र ते साहित्य जमा केंद्र असाच प्रवास करता येणार आहे. एखादा मतदान अधिकारी किंवा केंद्राधिकाऱ्याने मतदान साहित्य घेतल्यानंतर मतदान केंद्र सोडून इतरत्र जाण्याचा प्रयत्न केल्यास सदरील अ‌ॅपद्वारे त्याचा शोध निवडणूक विभागाला तात्काळ लागणार आहे. सदरील अ‌ॅप जीपीएस बेस असल्यामुळे तंतोतंत माहिती मिळणार असल्याने मतदान साहित्य स्वीकारल्यानंतर ठरवून दिलेले कामाव्यतिरिक्त्‍व ठिकाणाशिवाय इतरत्र जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर थेट कारवाई निवडणूक आयोगाद्वारे करण्यात येऊ शकते. एकंदरित निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी या अ‌ॅपचा चांगला उपयोग होऊ शकत असल्याचे सांगण्यात येत आहे.

मतदान केंद्राध्यक्ष व प्रथम मतदान अधिकारी यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी चक्र अ‌ॅपची निर्मिती करण्यात आलेली असताना समाजमाध्यमावर (सोशल मिडिया) होत असलेल्या प्रचारावर आयोग लक्ष ठेऊन आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावर निवडणूक आयोगाचं बारीक लक्ष आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या प्रचारावर देखील आयोगाची करडी नजर आहे. समाजमाध्यमांचा गैरवापर करुन खोटी, चुकीची, आक्षेपार्ह माहिती पसरवणाऱ्यांवर देखील आयोग लक्ष ठेवून आहे. जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर विविध टीम यावर लक्ष ठेवून आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button