तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री झाले की, मी पुन्हा उपोषणाला बसलोच : जरांगे पाटील
अंतरवली सराटी : महायुती सरकारचा शपथविधी 25 नोव्हेंबरला वानखेडे स्टेडिअम किंवा राजभवनात शपथविधी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यात राज्यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव चर्चेत आहे. मुख्यमंत्री झाल्यावर फडणवीस यांनी मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. नसता तुम्ही तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री झाले की, मी पुन्हा उपोषणाला बसलोच, असा इशारा त्यांनी दिला आहे.
ते पुढे म्हणाले की, “मी समाजाला सांगितलं होतं, ज्याला निवडून आणायचं ज्याला निवडून आणा अन् ज्याला पाडायचे त्याला पाडा. आमच्या मागण्या मान्य करायच्या नाहीतर सामूहिक उपोषण होणार, असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय. मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायचे काम करायचं नाही. राज्यात अर्धी गावं आमची आहेत. तुमच्या मागणी मान्य करायच्या, आमच्याशी बेईमानी करायची नाही. तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री झाले की, मी पुन्हा उपोषणाला बसलोच समजा. तुम्ही पुन्हा या, मी पुन्हा उपोषणास बसतो. काय व्हायचे ते बघू या. आपल्यापाशी सुट्टी नाही, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, यापूर्वीही तेच होते. दुसरे कोणी नव्हते. मराठे सगळ्यांशी खेटले आहेत. मराठ्यापुढे कोणीही सत्ताधारी नाही. मी मराठ्यांची पोर मोठे करण्याचा ध्यास घेतला आहे. आरक्षण देण्याचे वचन समाजाला दिलेले आहे. पडणारे पडले, निवडून येणारे आले. आपण त्यांचे संसार मोठे केले. आम्ही पडलेला आणि निवडून आलेला दोघांनाही मतदान केलेले आहे. आता या दोघांनी मराठ्यांच्या गोरगरीब पोरांच्या आंदोलनात सहभागी व्हायचे. असं देखील मनोज जरांगे यावेळी म्हणाले आहेत.