क्राइममहाराष्ट्र

पुण्यातील कुख्यात गँगकडून माजी आमदाराच्या जीवाला धोका

सोलापूर : पुण्यातील कुख्यात गँगकडून माझ्या जीवाला धोका आहे. माझे अपहरण करून खंडणी किंवा जीवे मारण्यासाठी पुण्यातील नामचीन टोळीला सुपारी देण्यात आली आहे, असा आरोप करत मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.

माझ्या जीविताला धोका आहे. माझे अपहरण करून खंडणी किंवा जीवे मारण्यासाठी पुण्यातील नामचीन टोळीला सुपारी देण्यात आली आहे. याप्रकरणी काही दिवसांपूर्वी तीन आरोपींना अटक झाली असून मुख्य आरोपी आबा काशीद अद्यापही फरार आहे. आरोपी आबा काशीद हा पुण्यातील नामचीन टोळीचा सदस्य असल्याने माझ्या जीवितास धोका आहे. त्यामळे जोपर्यंत या प्रकरणाचा तपास लागत नाही, तोपर्यंत मला पोलीस संरक्षण द्यावे असे रमेश कदम म्हणाले.

रमेश कदम यांच्याकडून खंडणी घेणे किंवा त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी मोहोळ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर मुख्य आरोपी आबा काशीद अद्याप फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे.

रमेश कदम हे मोहोळ विधानसभा मतदारसंघात 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले होते. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी रमेश कदम यांना अटक झाली होती. 2019 साली त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात तुरुंगात असताना अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून मोहोळ विधानसभेची निवडणूक लढवली होती. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button