अरहान खान नाही तर या क्रिकेटपटूला डेट करते रवीना टंडनची मुलगी राशा
मुंबई : बॉलिवूडची हॉट अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी ही सुध्दा आईप्रमाणेच हॉट असून तिच्या हॉट फोटाशूटमुळे ती बी टाऊनमध्ये कायमच चर्चेत असते. तसेच राशा नेहमीच तिचे हॉट फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. या फोटोमुळे इंटरनेट जगतातही खळबळ माजते.
काही दिवसापुर्वी राशा थडानीचे नाव मलायका अरोरा हिचा मुलगा अरहान खानसोबत जोडले जात होते. ते दोघेही बऱ्याच वेळा सोबत डेट करताना दिसले होते. मात्र आता तिचं नाव एका क्रिकेटपटूंसोबत जोडलं जातंय. एका चाहत्याने तिला याबद्दल प्रश्न विचारत या चर्चेला तोंड फोडलंय.
राशा लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. मात्र त्यापूर्वी भारतीय क्रिकेटपटू कुलदीप यादवसोबत तिचं नाव जोडलं जात आहे. एका चाहत्याने तिच्या पोस्टवर प्रश्न विचारला, “तू कोणत्या क्रिकेटरला डेट करते आहेस का?” या चर्चेचं कारण म्हणजे कुलदीप यादवने राशाचे आणि तिच्या मित्र-मैत्रिणींसोबतचे काही फोटो लाइक केले आहेत. राशाच्या पोस्टवर तमन्ना भाटिया आणि डायना पेंटीसोबतचे फोटो होते, ज्यामुळे चाहत्यांनी तिच्या नातेसंबंधांबद्दल तर्क लावायला सुरुवात केली. कुलदीपने राशाला इन्स्टाग्रामवर फॉलो केल्यामुळे या अफवा अधिक जोर धरू लागल्या आहेत.
राशाला आधीच 1.2 मिलियन फॉलोअर्स आहेत, त्यामुळे तिच्या प्रत्येक पोस्टकडे चाहत्यांचं लक्ष वेधलं जातं. राशा थडानी लवकरच ‘आझाद’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात अजय देवगण आणि अमन देवगण यांच्या प्रमुख भूमिका असून, डायना पेंटी, मोहित मलिक आणि पियुष मिश्रा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. अभिषेक कपूर या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.
शालेय जीवनातही राशा अतिशय सक्रिय होती. तिने मुंबईच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण घेतलं असून, तायक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवलाय. दुसरीकडे, कुलदीप यादव नुकताच जर्मनीहून परतला असून, तो सध्या दुखापतीतून सावरत आहे. लवकरच तो भारतीय संघात पुनरागमन करेल, अशी अपेक्षा आहे. आतापर्यंत राशा किंवा कुलदीपने या अफवांबाबत कोणतंही वक्तव्य केलं नाही.