देश-विदेश

मोबाईल जास्त वापरणे हानिकारक…. मोबाईलवर असणारा तंबाखूसारखी चेतावणी

नवी दिल्ली : मोबाईलचा वापर हा आजच्या काळात अत्यावश्यक गरज बनली आहे. स्मार्टफोनमुळे अनेक काम घरबसल्या चुटकीसरशी होत आहे. मात्र या स्मार्टफोनचे अनेक दुष्पपरिणाम आपल्याला दिसून येत आहे. त्यातच स्मार्टफोनचे व्यसन हे आजच्या काळात सर्वात मोठे व्यसन बनले आहे. यातून कोणाचीही सुटका होणे कठीण आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच स्मार्टफोनचे व्यसन लागले आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, स्पॅनिश सरकार आता सिगारेटसारख्या व्यसनाच्या श्रेणीत त्याचा समावेश करत आहे. स्मार्टफोन आपल्या झोपेवर, मानसिक आरोग्यावर आणि वैयक्तिक नातेसंबंधांवर, विशेषत: किशोरवयीन आणि तरुण प्रौढांमधील प्रभावित करते.

स्पॅनिश सरकारने मोबाईलच्या वापराला “सार्वजनिक आरोग्य महामारी” म्हणत स्पेनने एक मोठे पाऊल उचलण्याचा प्रस्ताव दिला आहे. स्पेनमध्ये विकल्या जाणाऱ्या सर्व स्मार्टफोन्सना आता आरोग्यविषयक चेतावणी देणे आवश्यक असेल. सिगारेटच्या पाकिटांवर ठेवलेल्या चेतावणी संदेशांसारखेच असेल, ज्याचा उद्देश स्मार्टफोनच्या अत्यधिक वापराच्या जोखमींबद्दल जागरुकता वाढवणे आणि लोकांना त्यांचा विवेकबुद्धीने वापर करण्यास प्रोत्साहित करणे आहे. स्पेन सरकारने नियुक्त केलेल्या तज्ज्ञांच्या समितीने 250 पानी अहवालात हा प्रस्ताव दिला आहे.

स्पेनच्या समितीच्या शिफारशी –
-स्मार्टफोन आणि डिजिटल सेवांवर चेतावणी संदेश असणे बंधनकारक असावे. अहवालात डिजिटल सेवांवर अनिवार्य आरोग्य चेतावणी, अतिवापर आणि हानिकारक सामग्रीच्या जोखमींबद्दल माहितीची शिफारस केली आहे. हा संदेश सिगारेटच्या पाकिटावरील इशाऱ्यांसारखाच असेल, पण थोडा कमी कठोर असेल.

-काही ॲप्स आणि प्लॅटफॉर्म वापरताना स्क्रीनवर सावधगिरीचे संदेश दाखवण्याची शिफारस केली आहे. लहान मुलांसाठी डिजिटल उपकरणांवर बंदी घालावी, असे म्हटले आहे. तीन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी डिजिटल उपकरणांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याची शिफारस केली आहे.

-तीन ते सहा वर्षे वयोगटातील मुलांसाठी, त्याचा वापर केवळ विशेष परिस्थितीतच करण्याची शिफारस केली आहे. 12 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाचा वापर प्रतिबंधित करण्याचा सल्ला आणि 16 वर्षांपर्यंतच्या किशोरवयीन मुलांसाठी मर्यादित कार्यक्षमतेसह “डंबफोन्स” वापरण्यास प्रोत्साहित करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button