एकनाथ शिंदे यांनी केले उध्दव ठाकरे यांना ‘फॉलो’
मुंबई : महायुतीच्या यशानंतर त्यांच्यात असलेले खातेवाटपात शिंदे गट हा नाराज होता. मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद स्विकारण्यास उत्सुक नव्हते. तशी नाराजी ही त्यांनी दर्शविली होती. मात्र राजकीय शिष्टाईत एक पाऊल मागे येत त्यांनी हे पद स्विकारले. त्याबद्दल्यात त्यांनी ग्रहमंत्रीपद द्यावे, अशी मागणी केली. मात्र या मागणीलाही भाजपने नकार दिला. अशातच एकनाथ शिंदे यांनी आपल्या अधिकृत फेसबूक अकाउंटवर चक्क उद्धव ठाकरेंच्या शिवसेना फेसबूक पेजला फॉलो केलं आहे. त्यामुळे वेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
ठाकरे आणि पुन्हा एकत्र येणार?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना फेसबूक फेसबुक पेजला फॉलो करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या पेजवरुन केवळ 9 जणांच्या पेजला फॉलो करण्यात आलं आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या पेजला फॉलो करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंना अचानक फॉलो कस काय केलं? पडद्यामागे नेमक्या कोणत्या घडामोडी चालल्यात? उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे पुन्हा एकत्र येतील का? असे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. मागील अडीच वर्षातील महाराष्ट्राचे राजकारण गाजले असेल तर ते एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्या नावानेचं.
एकनाथ शिंदे यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद
उद्धव ठाकरे यांच्याविरोधात जाऊन एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षांपूर्वी भाजपशी हातमिळवणी केली. त्याचे बक्षीस म्हणून महाशक्तीने त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवले. शिंदे यांनीही आपले कार्यकर्तृत्व सिद्ध केले. अडीच वर्षांचे यशस्वी सरकार चालविल्यानंतर निवडणुका पार पडल्या.