देश-विदेश

फोर्ब्सच्या शक्तिशाली महिलांच्या यादीत तीन भारतीय

फोर्ब्सने जगातील सर्वात शक्तिशाली महिलांची यादी जाहीर केली आहे. १०० महिलांच्या या यादीमध्ये चार भारतीय महिलांचा समावेश आहे. यातील एक नाव हे राजकीय क्षेत्रातील असून बाकीचे तीन नावे हे उद्योग क्षेत्रातील आहेत.

निर्मला सीतारमण
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना या यादीत स्थान पटकावलं आहे. जगातील प्रभावशाली महिलांमध्ये त्या 28 व्या क्रमांकावर आहेत. मे 2019 मध्ये त्या भारताच्या पूर्णकालीन अर्थमंत्री झाल्या. जून 2024 मधील लोकसभा निवडणुकीनंतर एनडीए सरकारने त्यांना पुन्हा अर्थमंत्री पदाची जबाबदारी सोपवली. त्या 4 ट्रिलियन अर्थव्यवस्था असलेल्या भारताची जबाबदारी सांभाळतात. जगातील ही पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. लवकरच भारतीय अर्थव्यवस्था जपान आणि जर्मनीला मागे टाकून तिसर्‍या क्रमांकावर पोहचण्याचा दावा करण्यात येतो. गेल्यावेळी या यादीत त्या 32 व्या क्रमांकावर होत्या. त्यांनी आता चार क्रमांक पुढे झेप घेतली आहे.

रोशनी नाडर मल्होत्रा
फोर्ब्सच्या शक्तिशाली महिलांच्या यादीत रोशनी नाडर-मल्होत्रा या 81 व्या स्थानावर आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासोबत त्या या यादीत आहेत. रोशनी नादर मल्होत्रा या HCL च्या संस्थापक आणि उद्योगपती शिव नाडर यांची मुलगी आहे. एचसीएल टेक्नोलॉजीजचे सीईओ म्हणून त्या काम पाहत आहेत. त्यांनी जुलै 2020 मध्ये वडीलानंतर या पदाची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी पत्रकारिता आणि एमबीएचे शिक्षण घेतले आहे.

किरण मुजुमदार-शॉ
जगातील प्रभावशाली महिलांच्या यादीत किरण मुजुमदार-शॉ यांनी स्थान पटकवलं आहे. तर भारतातील त्या 91 व्या सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. फोर्ब्सच्या यादीत त्या 82 व्या क्रमांकावर आहेत. बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रात त्यांनी बाजी मारली आहे. 1978 मध्ये त्यांनी बायोफार्मास्युटिकल फर्म बायोकॉन या कंपनीची स्थापना केली होती. बायोकॉन ही बहुराष्ट्रीय कंपनी ठरली आहे. मलेशियात ही कंपनी इनशुलीनचे उत्पादन करते. किरण मुजुमदार यांनी कॅन्सरवर संशोधनासाठी ग्लासगो विद्यापीठाला 7.5 दशलक्ष डॉलरची मदत केली होती. तर कोरोना काळात औषध निर्मितीसाठी त्यांच्या कंपनीने मोठी मदत केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button