महाराष्ट्रराजकारण

यामुळे हुकले जेष्ठ नेते भुजबळ यांचे मंत्रीपद

मुंबई : महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात समावेश न केल्याने अनेक नेते आपल्या पक्षाच्या हायकमांडवर नाराज आहेत. त्यात सर्वात मोठे नाव अजित पवार गटातील छगन भुजबळांचे होते, ज्यांना राष्ट्रवादीकडून मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. याबाबत भुजबळ आणि त्यांच्या समर्थकांची नाराजी स्पष्टपणे दिसून येत होती.

छगन भुजबळ हे जरी नाराज असले तरीही त्याबद्दल पक्षाकडून कोणीही भूमिका मांडू नये, अशा सूचना देण्यात आली आहे. मात्र, आता एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनी त्यांचे खास नेते छगन भुजबळ यांना महाराष्ट्राचे मंत्री का होऊ दिले नाही यामागे चार मोठी कारणे असल्याचे सांगण्यात येत आहे.

ही आहेत कारणं ?

१) निवडणुकीमध्ये भुजबळ यांनी आपल्याच पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात काम केल्यामुळे पक्षातील लोक भुजबळ यांच्यावर नाराज होते.

२) छगन भुजबळ यांनी बळजबरीने मुलासाठी (पंकज भुजबळ) विधानपरिषद आमदारकी पदरात पाडून घेतली. त्यांचं हे कृत्य पक्षातील वरिष्ठ नेत्यांना आवडलं नाही अशी माहिती सूत्रांनी दिली.

३) तर छगन भुजबळ यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनी पक्षाविरूद्ध जाऊन महायुतीविरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळेही रोष व्यक्त होतोय अशी माहिती समोर आली.

४) तसेच नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदारानी छगन भुजबळ यांना मंत्रिपद देऊ नका अशी अजित पवार यांच्याकडे विनंती केली. भुजबळांना जर मंत्रीपद दिलं तर नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदार एकत्रित राजीनामा देतील असा इशाराही देण्यात आला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

1999 पासून अनेकवेळा मंत्री
छगन भुजबळ यांनी 1999 ते 2024 पर्यंत अनेक वेळा मंत्रीपद भूषवले आहे. भुजबळ हे 1999 ते 2003 आणि 2009 ते 2010 पर्यंत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. 2010 ते 2014 पर्यंत भुजबळ यांच्याकडे पृथ्वीराज चव्हाण सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटन खात्याची जबाबदारी होती. यानंतर 2019-22 मध्ये छगन भुजबळ हे तत्कालीन उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक खात्याचे मंत्री होते. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये छगन भुजबळ यांना पुन्हा तीच जबाबदारी देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button